ससाणे डीपी रत्नपुरी १८ वरील डीपी शिफ्टिंगला अखेर मंजुरीसंग्रामनगर परिसरातील नागरिकांना दिलासा; खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील व नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
अकलूज : ससाणे डीपी रत्नपुरी १८ मधील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डीपी शिफ्टिंगच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली आहे.
रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डीपीमुळे नागरिकांना वाहतुकीसह दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या डीपीचे स्थलांतर करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील आणि अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी या प्रश्नासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून डीपी शिफ्टिंगच्या कामाला मंजुरी मिळाल्याने संग्रामनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
डीपीचे स्थलांतर झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा दूर होण्यास मदत होणार असून नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे
. तसेच परिसरातील संभाव्य धोका कमी होऊन दैनंदिन वाहतूक व नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे.
या कामासाठी सहकार्य करणारे संबंधित अधिकारी, महावितरण प्रशासन तसेच सर्व नागरिकांचे सामाजिक कार्यकर्ते सचिन लोखंडे, हंसराज घुले आणि सुभाष थिटे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.






