सीसीएमपी डॉक्टरांकडून जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांना आभार निवेदनएमएमसी नोंदणी प्रक्रियेच्या प्रारंभाचे स्वागत; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाडू वाटून जल्लोष

पुणे, दि. ७ ऑगस्ट : सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याबद्दल सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज पुण्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र हुडी यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासन व संबंधित मान्यवरांचे आभार व्यक्त करणारे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मागणीला न्याय मिळाल्याचे नमूद करण्यात आले.
तसेच या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण, दुर्गम आणि शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून जनतेला गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र हुडी यांनी निवेदन स्वीकारून संबंधितांच्या भावना महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उपस्थित सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टरांनी तसेच विविध आयुष शाखांतील डॉक्टरांनी लाडू वाटून जल्लोष साजरा केला
. महाराष्ट्र शासनाने सीसीएमपी पात्र डॉक्टरांसाठी एमएमसी नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त करत उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी आयुष क्षेत्रातील विविध डॉक्टरांनीही या निर्णयाचे स्वागत करत सीसीएमपी पात्र डॉक्टरांना पाठिंबा दर्शविला.
निवेदनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसनजी मुश्रीफ, मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रबंधक डॉ. राकेश वाघमारे तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शाह यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अरुण भस्मे, आमदार डॉ. विक्रम काळे, राजेशजी पांडे, पृथ्वीराज पाटील, डॉ. रजनी इंदुलकर, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. किशोर मालोकर, डॉ. दादा कवीश्वर, एमयूएचएसचे डीन डॉ. राजकुमार पाटील, डॉ. राजेश रांजणीकर, डॉ. सोमनाथ गोसावी, डॉ. विलास हरपाले, डॉ. बाळासाहेब हरपळे तसेच राज्यातील सर्व होमिओपॅथिक संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि होमिओपॅथी क्षेत्रातील सर्व घटकांचे योगदानही यावेळी गौरविण्यात आले

.या प्रसंगी सीसीएचचे मा. सदस्य डॉ. गिरीश धरफळे, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अमित भस्मे, प्रदेश सचिव डॉ. अजय तायडे पाटील, प्रदेश खजिनदार डॉ. निलेश चिकणे, पुणे शहर अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाकचौरे, हिमाचे डॉ. राहुल काळभोर, कोथरूड अध्यक्ष डॉ. राजकुमार अंबड, सदस्य डॉ. गिरिधर पणिकर, पुणे कॅन्टोनमेंटचे अध्यक्ष डॉ. संजय नाईक, डॉ. सलोनी नाईक, डॉ. मुकेश कावेडिया, चिंचवडचे डॉ. दिगंबर टोनपे, डॉ. विकास शेवाळे, मुळशी तालुकाप्रमुख डॉ. अमोल सोमसेटवर, खडकवासला प्रमुख डॉ. कैलास पारख, भोसरी प्रमुख डॉ. वेदांत आथकरी, पुणे शहर होमिओपॅथिक महिला संघटना अध्यक्षा डॉ. नयना सोनवणे, एचएचएफ पुणेचे समन्वयक डॉ. विवेक माळी, पीसीएमसी अध्यक्ष डॉ. विजय सुर्वे यांच्यासह विविध आयुष संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक आयुष डॉक्टर, तसेच मोठ्या संख्येने सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी असोसिएशनच्या वतीने भविष्यातही महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार जनतेला सेवाभावी, प्रामाणिक आणि जबाबदारीने आरोग्य सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.








