स्वाभिमानी मराठा महासंघाकडून राजेश मंगल विठ्ठल काकडे यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई | प्रतिनिधी
स्वाभिमानी मराठा महासंघ (महाराष्ट्र) यांच्या वतीने राजेश मंगल विठ्ठल काकडे यांची मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थापक डॉ.कृषिराज टकले पाटील यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून ही घोषणा केली.
मराठा समाजातील शेतकरी, विद्यार्थी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करावे, समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत संघटना अधिक सक्षम व व्यापक करावी, अशा अपेक्षा नियुक्तीपत्राद्वारे व्यक्त करण्यात आल्या आहेत.
या नियुक्तीबद्दल सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून राजेश मंगल विठ्ठल काकडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
समाजहितासाठी प्रामाणिकपणे व तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्वाभिमानी मराठा महासंघाने त्यांच्या भावी सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देत, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन केले आहे.







