१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)* *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ. एस.डी.अन् शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! चिवटेसर,आपणास आरोग्यदायी असं दीर्घायुष्य लाभो,ही आई जगदंबे चरणी प्रार्थना!

मित्रहो,समाजातील गोरगरीब,निर्धन लोकांना कुठलेही आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांना आपल्या महागड्या शस्त्रक्रिया करणे अशक्यप्राय असते.परिणामी त्यांना नाहक आपले जीव गमवावे लागतात.यावर तोडगा म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथजीशिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १७ नोव्हेंबर,२०१७ रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची कोपरी-ठाणे(पूर्व) येथे स्थापना केली.

अन् या कक्षाची धुरा आपले विश्वासू, कर्तव्यदक्ष,निष्ठावान सहकारी मंगेश चिवटे यांच्या हाती सोपविली.अन् त्यातूनच खऱ्या अर्थाने रुग्णसेवेची मुहूर्तमेढ झाली.
*रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा* हे ब्रीद अंगिकारून कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटेसर,उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत,सहकार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धुळगंडे,डॉ.निलेश देशमुख,भूषण सुर्वे अन् ठाणे-मुंबईसह राज्यातील सुमारे १० हजार रुग्णसेवक सामाजिक बांधिलकीच्या नात्यानेरुग्णसेवेत अव्याहतपणे कार्यरत आहेत.

यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.रुग्णसेवेची दुर्दम्य इच्छा असलेले राज्याचे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा जन्म १५ जून १९८८ रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील स्वातंत्र्यसेनानी साथी मनोहरपंत चिवटे(आजोबा) यांच्या देशप्रेमी घराण्यात झाला अन् जणू काय राज्यातील गोरगरीब,गरजू रुग्णांसाठी एक *आरोग्यदूत* उदयास आला.चिवटेसरांच्या वडिलांचे नाव नरसिंह मनोहरपंत चिवटे हे सोलापूर जिल्ह्यात प्रामाणिक,सच्चे व निडर पत्रकार म्हणून ओळखले जातात
,तर आईचे नाव सौ.मंदाकिनी नरसिंह चिवटे.मंगेश चिवटे यांच्या पत्नी सौ.शिल्पा अन् त्यांची ज्ञानेश्वर व मुक्ताई ही दोन बुद्धिमान मुलं.मंगेशसरांचे थोरले बंधू महेश चिवटे(शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख) व त्यांचा पूर्ण परिवार तनमनधनाने समाजसेवेत कार्यरत आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मंगेश चिवटे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्टार माझा,जय महाराष्ट्र,साम टी व्ही,आय बी एन लोकमत या वृत्तवाहिन्यांमध्ये सहाय्यक कॅमेरामन म्हणून काम केलं.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे २६/११ च्या मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अन् त्याप्रसंगी तत्कालिन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचे सीएसटी स्टेशनवर झालेलं आगमन या थरांरक प्रसंगांची दृश्ये कॅमेरामन म्हणून मंगेश चिवटे यांनी टिपली,हे त्यांच्या साहसीवृत्तीचं प्रतिक आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथील प्राचीन शिवमूर्तींना *अखंड पुष्पहार अर्पण उपक्रम* गेल्या सहा वर्षांपासून राबविला जात आहे.
याशिवाय येथील परिसर नित्यनेमाने स्वच्छ केला जात आहे.त्यामुळे शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पावित्र्य अबाधित राहिले आहे. हे पवित्र कार्य डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे.या अद्वितीय व अतुलनीय सेवेबद्दल कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी मंगेशसरांची पाठ थोपटून मुक्तकंठाने प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अत: खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचे मनस्वी अभिनंदन..!गत काळात ना.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यातल्या ६० हजारहून अधिक गोरगरीब,गरजू रुग्णांचे महागडे ऑपरेशन्स मुंबई,ठाणे येथील नामवंत हॉस्पिटल्समध्ये मोफत वा अल्प दरात करून देण्यात आले.
परिणामी सदर रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत.या कामी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्य प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून सुमारे ४५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले.इतकेच नव्हे तर,राज्यातील सुमारे ६००० गोरगरीब बच्चुंच्या हृदयावरील छिद्राचे ठाण्याच्या सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन करून देण्यात आलेत.
ही सर्व मुलं आता नवजीवनाचा मोकळा श्वास घेताहेत.याचं सर्वस्वी श्रेय मंगेश चिवटे यांना जाते.वास्तविक पहाता,या स्तुत्य रुग्णसेवेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या *राजकारणातून समाजकारण* करण्याच्या तत्वाचं तंतोतंत पालन केल्याचे सिद्धीस येते.संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या षष्ठीपूर्तीचे औचित्य साधून *हीरक आरोग्य वर्ष* निमित्त राज्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ६० हजार किलोमीटरची *आरोग्य संवाद यात्रा* काढण्यात आली.
याशिवाय राज्यातील ६० हजार ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राज्यभरात ६० महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.तसेच ६० हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ६०० लहान मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

एवढं करून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्यदूत मंगेश चिवटे हे थांबले नाहीत.राज्यातील *मस्क्युलर डिस्ट्राफी* सारख्या दुर्मिळ व जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या गरजू रुग्णांना मोफत इलेक्ट्रिकल व्हीलचेअरसह वेंटमेड बायपॅप वितरित करण्यात आले.यासाठी पालकांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले

.इतकेच नव्हे तर,ना.एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार अन् खासदार नरेश म्हस्केसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश चिवटे यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अन् रत्नविधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या गोरगरीब,गरजू दिव्यांग बंधू-भगिनींना गेल्या एक वर्षापासून *ठाण्याच्या आनंदाश्रमात मॉड्युलर हात/पाय मोफत बसवून* देण्यात येत आहेत.त्यामुळे आता दिव्यांग बंधू-भगिनी स्वावलंबी जीवन जगायला लागले आहेत.यासाठी दिव्यांगाच्या पालकांनी मान्यवरांचे आभार मानले.
*डेडिकेटेड टू कॉमन मॅन* अर्थातच डेप्युटी चीफ मिनिस्टर मा.एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली *शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व करुणा सेवा ट्रस्ट* यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासह देशभरातून परळ-मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दर रविवारी हॉस्पिटलच्या आवारात सकाळी भोजन व औषध वाटपाची व्यवस्था करण्यात येते
.त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांची मोठी सोय होत असल्याने त्यांनी मान्यवरांचे आभार प्रकट केले.सदर उपक्रम पुढे असाच चालू राहील,असे आश्वासन शिंदेसाहेबांनी दिले आहे.बंधू-भगिनींनो,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्य प्रमुख मंगेश चिवटे हे *उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष* च्या माध्यमातून राज्यातल्या हजारों गोरगरीब,गरजू लोकांचे कॅन्सर,ब्रेन ट्युमर,किडनी,लिव्हर,बोनम्यारो ट्रान्सप्लांट,बायपास सर्जरी,एंजिओप्लास्टी,भाजलेले रुग्ण,अपघाती रुग्ण,मोतीबिंदू,कोकलीयर एम्प्लान्ट आदी व्याधींच्या महागड्या शस्त्रक्रिया ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल,गंगुबाई संभाजीराव शिंदे मल्टिप्लिसिटी हॉस्पिटल,सिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये मोफत वा अल्प दरात करून देण्यात येत आहेत.त्यासाठी आवश्यक तेवढा निधी गरजू रुग्णांसाठी अर्थसहाय्य म्हणून उपलब्ध करून दिला जात आहे.
त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरोग्याचे प्रश्न मार्गी लागण्यात मोठा हातभार लागत आहे.राज्यातला एकही गरीब,गरजू रुग्णाला पैशांअभावी आपला जीव गमवावा लागणार नाही,यासाठी महायुती सरकार हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून निर्धन रुग्णांसाठी आवश्यक तेवढे अर्थसहाय्य उपलब्ध देत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी. व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक प्रमुख मंगेश चिवटे यांना आरोग्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अटल पुरस्कार समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते *अटल श्री पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.
वास्तवात आरोग्य क्षेत्रातील स्तुत्य कार्य केल्याबद्दल गेल्या १० वर्षात त्यांना अनेक नामवंत संस्था-संघटनांकडून विविध स्वरूपाचे पुरस्कार मिळाले आहेत.त्याचप्रमाणे झी २४ तास आरोग्य परिषद- २०२५ मध्ये संपादक कमलेश सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते मंगेश चिवटे यांना *झी २४ तास सन्मान पुरस्कार* प्रदान करून गौरविण्यात आले
.विशेष म्हणजे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अन् खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वरदहस्तामुळे चिवटेसरांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली आहे,हे सूर्य किरणाएवढं शुभ्र सत्य आहे.आरोग्यदूत मा.मंगेश चिवटेसर हे आता समाजकारण करण्यासाठी थेट राजकारणात उडी घेताहेत.वास्तवात त्यांच्या या निर्णयास राजमान्यता असून,जनमानसाचा सकारात्मक कौलही मिळाला आहे
.ते स्वतः एम.ए.,बी. एड.,एल.एल.बी.असे उच्च विद्याविभूषित युवा नेते आहेत.याशिवाय त्यांनी पत्रकारितेची पदविका देखील संपादन केली आहे.अत: देशाच्या भावी पिढीच्या भवितव्याला सुयोग्य आकार देणाऱ्या शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडून ते शासनस्तरावर सोडविण्यासाठी *भावी आमदार मंगेश चिवटे* हे गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.शिक्षकांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्याशिवाय चिवटेसर हे आता स्वस्थ बसणार नाहीत,हा खऱ्या अर्थानं त्यांचा दृढसंकल्पच आहे.यासंदर्भात चिवटेसरांनी शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली
.या कामी आपण सर्वजण त्यांना सुयश चिंतूयावास्तविक पहाता,भावी पिढीचे शिल्पकार असलेल्या शिक्षकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावेत,यासाठी पुणे विभागातील शिक्षक-शिक्षिकांनी चिवटेसरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे अन् त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी,असे आवाहन करण्यात येते.
राज्यातल्या तमाम शिक्षकांतर्फे चिवटेसरांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! जय महाराष्ट्र! ✍️ *लेखक-रणवीर राजपूत**उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष,महाराष्ट्र राज्य*







