• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
June 6, 2026
in महाराष्ट्र
0
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी;                                                      खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

मुंबई, प्रतिनिधी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित लोकप्रिय मराठी मालिका बंद करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्टार प्रवाह वाहिनीला लिहिलेल्या खुल्या पत्राद्वारे केली आहे.

समाजप्रबोधन, स्त्री शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या मालिकेचा प्रवास थांबवण्याचा निर्णय दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्राच्या सुरुवातीला “जय ज्योती, जय क्रांती” असा संदेश देत मोहिते पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजसुधारणेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारी ही मालिका प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत होती.

अशा वेळी मालिका बंद होणे ही केवळ एका दूरचित्रवाणी मालिकेची समाप्ती नसून समाजसुधारकांच्या विचारांना मिळणाऱ्या व्यासपीठावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.मालिका बंद करण्यामागे टीआरपी हे कारण सांगितले जात असल्याचे समोर येत असले तरी ते पूर्णपणे पटणारे नसल्याचे त्यांनी नमूद केले.

आजही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ही मालिका आवर्जून पाहतात, तिच्यावर चर्चा करतात आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख करून देण्याचे महत्त्व मान्य करतात. त्यामुळे केवळ टीआरपीच्या निकषावर असा निर्णय घेण्यात आल्याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे.

यासोबतच, अनेक काल्पनिक आणि साचेबद्ध सासू-सुनेच्या मालिका वर्षानुवर्षे सुरू राहतात, मात्र इतिहास, सामाजिक परिवर्तन आणि प्रेरणादायी विचार मांडणाऱ्या मालिका अल्पावधीत बंद होतात, हा प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे या निर्णयामागे इतर कोणते कारण किंवा दबाव आहे का, याबाबतही समाजात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.

खा. मोहिते पाटील यांनी अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे उदाहरण देत, “स्वराज्यरक्षक संभाजी” सारखी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मालिका ज्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली, त्याच धर्तीवर “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” ही मालिका देखील कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रसारित करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे केवळ एका समाजघटकाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रसार सातत्याने होत राहणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. त्यांचे कार्य, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याने संबंधित वाहिनी आणि निर्मात्यांनी मालिका बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून ती सुरू ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, या खुल्या पत्रानंतर सामाजिक, शैक्षणिक आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेतील कार्यकर्त्यांमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली असून, मालिकेच्या भवितव्याबाबत आता स्टार प्रवाह वाहिनीची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध

June 30, 2026
मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न
महाराष्ट्र

मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न

June 29, 2026
सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार
महाराष्ट्र

सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार

June 27, 2026
१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)*                                 *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*
महाराष्ट्र

१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)* *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*

June 15, 2026
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड
महाराष्ट्र

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड

June 4, 2026
विश्वमंगल मराठी फाउंडेशनची अकलूज येथे संवाद बैठक उत्साहात संपन्न*                                                        *मराठी उद्योजकांचे जागतिक नेटवर्क, ग्रामीण उद्योगांना चालना, शिक्षण क्षेत्रात लोकसहभाग आणि गावागावांत विकासाची नवी चळवळ उभारण्याचा निर्धार*

June 1, 2026
Next Post
मालवंडीत अवैध गुटखा विक्री करणारा जेरबंद; निर्भया पथकाची संयुक्त कारवाई

मालवंडीत अवैध गुटखा विक्री करणारा जेरबंद; निर्भया पथकाची संयुक्त कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!