विशेष/ प्रतिनिधी भैय्या खिलारे:
मालवंडी येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर बार्शीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी IPS अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक करमाळा व बार्शी यांनी संयुक्त कारवाई केली.
या कारवाईत आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक कायम असल्याचे या कारवाईतून दिसून आले.मालवंडी येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्याला IPS अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक करमाळा व बार्शी यांनी मुद्देमालासह पकडले.







