हॉटेल एकता गार्डनचे नूतनीकरण व उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

माळशिरस प्रतिनिधी : रणजितदादा गायकवाडबागेची वाडी गावाजवळ अकलूज–माळशिरस मार्गावर असलेल्या हॉटेल एकता गार्डनचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला
.प. पू. जय जय महाकाली रमेशजी महाराज तसेच प. पू. स्वामी श्रीपादतीर्थ महाराज यांच्या हस्ते फीत कापून हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा धार्मिक व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी गायकवाड परिवारातील दत्तात्रय गायकवाड, राम गायकवाड आणि अशोक गायकवाड यांच्यासह परिवारातील इतर सदस्य, मित्रमंडळ तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
. उपस्थितांनी हॉटेलच्या नूतनीकरणाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते.
उपस्थितांचे स्वागत व आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.






