*अकलूजच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेश्माताई लालासाहेब अडगळे यांना गोवा राज्यात “भास्कर अवॉर्ड २०२६” प्रदान*
पणजी : अकलूज शहराच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रेश्माताई लालासाहेब अडगळे यांनी अवघ्या पाच महिन्यातच अकलूज शहराच्या विकासात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा त्यांना “भास्कर अवॉर्ड २०२६” जाहीर झाला असून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळा यावर्षी दिनानाथ मंगेशकर कला ॲकाडमी मिरमार ब्रॅच रोड पणजी, गोवा राज्य येथे सौ. रेश्माताई अडगळे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी संस्था असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी “भास्कर अवॉर्ड” देऊन गौरवीत असते.पुरस्कार स्वतःहून येतील असे आदर्श काम करा भास्कर पुरस्कार सोहळ्यात सभापती डॉ. गणेश गांवकर यांचे मार्गदर्शन पुरस्कार तुमच्यापर्यंत चालत येतील असे आदर्श काम प्रत्येकाने करावे.
जीवनात यशाला शॉर्टकट नाही, आणि कष्टाशिवाय कुणालाही काहीच मिळत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने कष्टाचे महत्व ओळखावे, तसेच आदर्श काम केलेल्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन वाटचाल करावी, यश आपोआप चालत येईल, असे प्रतिपादन गोवा विधानसभा सभापती डॉ. गणेश गांवकर यांनी केले.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित प्रतिष्ठेच्या ‘दी प्राईड ऑफ इंडिया: भास्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात झालेल्या सोहळ्यास त्यांच्यासमवेत आमदार चंद्रकांत शेट्ये, माजी उपमुख्यमंत्री,कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर, धेंम्पो कॉलेज चे प्राचार्य मनोज कामत, गोवा मराठी एकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, दै. ‘तरुण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, संस्थाध्यक्ष राजीव लोहार, महिला विभाग अध्यक्षा मनिषा लोहार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अकलूज शहराला स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक शहर म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी अकलूज नगरपरिषद सातत्याने विकासकामांच्या माध्यमातून पुढे जात आहे
. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय मा. श्री. विजयसिंह (दादासाहेब) मोहिते पाटील, स.म.श.मो.पा. साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील, विधानपरिषद माजी आमदार आदरणीय मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील, तसेच गटनेते तथा उपनगराध्यक्ष मा. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेश्माताई यांनी अकलूज शहरातील मूलभूत सुविधांची कामे गतीने सुरू केली आणि ते कौतुकास्पद आहेत.
सौ. रेश्माताई अडगळे यांनी नगराध्यक्षा पदाचा पदभार घेऊन अवघे पाच महिने झालेले आहेत. अकलूज शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून. अकलूज शहराला अधुनिक बनवण्यासाठी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि नागरिकाभिमुख विकासकामांमध्ये त्यांनी विशेष लक्ष घालून प्रभावी नेतृत्व करत आहेत.
“स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक अकलूज” या संकल्पनेतून त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत “भास्कर अवॉर्ड २०२६” त्यांना प्रदान करण्यात आल्याने अकलूज शहरासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विविध सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







