• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा; २३ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
May 19, 2026
in महाराष्ट्र
0
माळशिरस तालुक्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा; २३ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस तालुक्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा; २३ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

अकलूज (प्रतिनिधी) — मराठा आरक्षण, कुणबी दाखले तसेच मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता पुन्हा एकदा वेग येताना दिसत आहे.

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे पाटील यांनी दि. ३० मेपासून त्यांच्या अंतरवाली सराटी या गावी पुन्हा प्राणांतिक आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यभरातील मराठा समाजामध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातूनही हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असून, त्याच्या नियोजनासाठी दि. २३ मे रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

.सोमवारी अखंड मराठा समाज, माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाची भूमिका, आंदोलनाची पुढील दिशा तसेच उपोषणासाठी होणाऱ्या उपस्थितीचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा आमरण उपोषण केले आहे.

प्रत्येकवेळी समाजाच्या हितासाठी त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता आंदोलन उभारले. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असून, समाजामध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

तसेच, राज्यभरातील लाखो मराठा बांधवांना सोबत घेऊन दोन वेळा मुंबईकडे भव्य मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनांदरम्यान शासनाकडून अनेक आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नसल्याची भावना समाजामध्ये तीव्र झाली आहे.

वारंवार मुदती देऊनही शासनाने केवळ वेळकाढूपणा केला असून मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर “आर नाही तर पार” अशी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून पुन्हा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून माळशिरस तालुक्यातील मराठा समाजही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर दि. २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कृष्ण लीला बॅकवेट हॉल, डॉ. धनेश गांधी हॉस्पिटल शेजारी, येथे सर्वपक्षीय मराठा बांधवांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस सत्ताधारी व विरोधी पक्षातील विविध नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मराठा समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली

.उपोषणासाठी जाणाऱ्या बांधवांची संख्या, वाहतूक व्यवस्था, संपर्क प्रमुखांची नियुक्ती तसेच आंदोलनाचे नियोजन या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

#मराठा_आरक्षण#मनोजजरांगेपाटील#अखंडमराठासमाज#माळशिरस#मराठासमाज#कुणबीदाखले#मराठाआंदोलन#अंतरवालीसराटी#मराठायोद्धा#मराठाएकजूट#आरक्षणआमचाहक्क#मराठाक्रांती#सर्वपक्षीयबैठक#मराठाबांधव#जयजिजाऊ#जयशिवराय#MarathaReservation#ManojJarangePatil#MarathaAndolan

Related Posts

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध
महाराष्ट्र

मुंबईत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा; लाखो नागरिकांची उपस्थिती, विविध मान्यवरांचा तीव्र विरोध

June 30, 2026
मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न
महाराष्ट्र

मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न

June 29, 2026
सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार
महाराष्ट्र

सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांवर चंद्रकांतदादांची सकारात्मक भूमिका; मागण्या मान्य होईपर्यंत सत्कारास नकार

June 27, 2026
१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)*                                 *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*
महाराष्ट्र

१५ जून – आरोग्यदूत मंगेश चिवटे यांचा वाढदिवस(उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ओ.एस.डी.)* *भावी आमदार मंगेश चिवटे- रुग्णसेवेसह शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अग्रेसर*

June 15, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी;                                                      खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र
महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मालिका बंद करण्याच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी; खा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्टार प्रवाहला खुलं पत्र

June 6, 2026
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड
महाराष्ट्र

जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड

June 4, 2026
Next Post
माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावांचा दौरा; शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मैदानात

माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावांचा दौरा; शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!