माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावांचा दौरा; शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील मैदानात

अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या गावांतील शेतकरी व नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यात विविध गावांना भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या अडचणी, सूचना आणि भावना जाणून घेतल्या जाणार आहेत .या दौऱ्याचे नेतृत्व खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील करणार असून, शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शक्तीपीठ महामार्गामुळे जमीन संपादन, शेतीचे नुकसान, विस्थापन आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर होणारे परिणाम याबाबत अनेक गावांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :सकाळी ११:०० वाजता – गारवाड सकाळी ११:४० वाजता – मगरवाडी (गारवाड)दुपारी १२:२५ वाजता – चांदापुरी दुपारी १:१० वाजता – तरंगफळ दुपारी २:०० वाजता – निमगाव [म]दुपारी २:५० वाजता – वेळापूर दुपारी ३:३० वाजता – उघडेवाडी
या दौऱ्यादरम्यान सर्व शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या भावना आणि मागण्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.






