आय चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांच्या वतीने महिलांसाठी आत्मनिर्भरतेची नवी संधी
अकलूज : (प्रतिनिधी )महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आय चॅम्प अबॅकस प्रा. लि. या कंपनीकडून विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे.
केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक करून महिलांना दरमहा 20 ते 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याची संधी या योजनेद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे.
सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये वेगाने विस्तार होत असलेल्या या कंपनीने महिलांसाठी अबॅकस फ्रेंचायझीची संधी उपलब्ध करून दिली आहे
. विशेषतः ग्रॅज्युएट, डी.एड., बी.एड. धारक तसेच खाजगी क्लासेस चालवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
कंपनीच्या माहितीनुसार, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना लाइफटाइम सपोर्ट तसेच सोशल मीडिया मार्केटिंगची मदत दिली जाणार आहे.
सध्या कंपनीच्या 50 हून अधिक शाखा असून सुमारे 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या योजनेत सहभागी होण्यासाठी आठवड्यातून केवळ दोन दिवस काम करून पार्टटाइम स्वरूपात उत्पन्न मिळवता येणार आहे.
याशिवाय मिडब्रेन, फोटोग्राफिक मेमरी आणि क्वांटम स्पीड रीडिंग यांसारखे इतर कोर्सेसही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पहिल्या 20 महिलांसाठी मोफत फ्रेंचायझी आणि ऑन-द-स्पॉट नोंदणीची सुविधा देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन संचालक स्नेहल माने आणि विशाल माने यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी यमुना बिल्डिंग, प्रताप क्रीडा मंडळ, यशवंतनगर, अकलूज येथे संपर्क साधावा किंवा 9850754004 या क्रमांकावर संपर्क करावा.







