बाजार समिती अकलूजमध्ये जनावरांचा बाजार बहरला
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार आवारामध्ये शुक्रवारी जनावरे बाजार भरविण्यात आलेला होता. त्यास शेतकरी व व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

मा.श्री.विजयसिंह मोहिते-पाटील मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सुचनेनुसार जनावरांचा बाजार सोमवार बरोबरच प्रत्येक शुक्रवारी भरविण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
त्यामुळे पहिल्याच शुक्रवारी ३०० गाय व म्हशीची आवक झाली होती.चांगल्या गाय व म्हशी बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
पायाभूत सुविधांबरोबरच सुरक्षितता व व्यवहारातील पारदर्शीपणा आणण्यासाठी बाजार समितीच्या वतीने उपाययोजना केलेली होती. जनावरे बाजार आठवड्यातून दोनदा भरल्याने माळशिरस तालुक्यासह इतर तालुक्यातील व्यापारी तसेच शेतक-यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार असून दुस-या बाजारासाठी जाणारा खर्चही वाचणार आहे.
येथुन पुढे दर शुक्रवारी जनावरांचा बाजार भरविण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे सभापती मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
शेतकरी व व्यापा-यांना कोणतीही अडचण वाटल्यास बाजार समितीच्या अधिका-यांना त्वरीत भेटावे.
त्यांच्यासाठी विशेष कक्ष स्थापन केलेचे बाजार समितीचे सचिव श्री.राजेंद्र काकडे यांनी सांगितले.






