*संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका:* “*लग्न जमेना… कळी सुटेना*!” *घटस्फोटित आणि विधवा/विधुर विवाहासमोरील आव्हाने;* *समाजाचा दृष्टिकोन आणि दुसरी संधी मिळवतानाची कसरत!* *क्रमशः भाग ८*
अकलूज:(प्रतिनिधी )विवाहाचे पहिले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत किंवा जोडीदाराचे अकाली निधन झाले, तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण येण्यासाठी ‘पुनर्विवाह’ हा एक कायदेशीर आणि नैसर्गिक मार्ग आहे.
मात्र, आजही आपला समाज याकडे तितक्या मोकळेपणाने पाहायला तयार नाही. घटस्फोटित किंवा विधवा/विधुर व्यक्तींना जोडीदार शोधताना अनेकदा तिरस्काराची किंवा सहानुभूतीची नजर सोसावी लागते, ज्यामुळे हा प्रवास अधिक खडतर होतो.
*दुसऱ्या’ लग्नाकडे पाहण्याचा जुनाट दृष्टिकोन*
अजूनही समाजात “मुलगी घटस्फोटित आहे” म्हटलं की तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, तर मुलाच्या बाबतीत “काहीतरी व्यसन असेल” किंवा “स्वभाव खराब असेल” असा कयास बांधला जातो. पहिल्या विवाहातील अपयश हे नेहमीच कोणा एकाच्या चुकीमुळे नसते, हे समजून घेण्याची मानसिकता अद्याप रुजलेली नाही.
यामुळे अशा व्यक्तींना पुन्हा आयुष्याची सुरुवात करायची इच्छा असूनही समाजाच्या टोमण्यांमुळे ते मागे सरकतात.
*मुले आणि कौटुंबिक जबाबदारीचा पेच*
घटस्फोटित किंवा विधवा/विधुर व्यक्तींना मुले असतील, तर लग्नाचा पेच अधिक वाढतो. “दुसरा बाप/आई मुलांचे कसे करेल?” किंवा “मालमत्तेत हिस्सा द्यावा लागेल का?” या भीतीपोटी अनेकदा चांगली स्थळे नाकारली जातात.
जोडीदार निवडताना केवळ त्या व्यक्तीला न पाहता मुलांच्या भविष्याचा विचार करणे ही तारेवरची कसरत असते. अशा वेळी दोन्ही कुटुंबांच्या समन्वयाचा अभाव विवाहातील मोठा अडथळा ठरतो.
*आयुष्याला दुसरी संधी द्या*!
प्रत्येक व्यक्तीला सुखी होण्याचा आणि एकटेपणा दूर करण्याचा अधिकार आहे. आजची तरुण पिढी पुनर्विवाहाकडे सकारात्मकतेने पाहत असली, तरी समाजातील ज्येष्ठ मंडळींनीही आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
ज्यांचे संसार मोडले आहेत किंवा ज्यांनी आपला जोडीदार गमावला आहे, त्यांना ‘आधार’ देण्याऐवजी ‘स्थिरता’ मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा. *क्रमशः भाग ८* *पुढील भागात आपण पाहणार आहोत: “संवाद आणि स्पष्टवक्तेपणाचा अभाव – लग्नापूर्वी नेमके काय बोलावे*?”
#संघर्ष_योद्धा #लग्नजमेना_कळी_सुटेना #पुनर्विवाह #दुसरीसंधी #नवीनसुरुवात #घटस्फोटित #विधवा #विधुर #समाजाचादृष्टिकोन #सामाजिकबदल #आयुष्यपुन्हासुरू #एकटेपणावरमात #नवीनआयुष्य #आशेचीकिनार #सुखाचाशोध #कौटुंबिकजबाबदारी #नातेसंबंध #विश्वासआणिसंवाद #कुटुंबमहत्त्वाचे
🔔 *संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल चे आवाहन* 🔔
समाजातील ज्वलंत प्रश्न, न बोललेले विषय आणि वास्तव आयुष्याशी निगडित संघर्ष लोकांसमोर मांडण्याचे काम संघर्ष योद्धा न्यूज सातत्याने करत आहे.घटस्फोटित तसेच विधवा/विधुर बांधवांच्या पुनर्विवाहासंदर्भातील समस्या, समाजाचा दृष्टिकोन आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर सुरू असलेल्या “लग्न जमेना… कळी सुटेना!” या वृत्तमालिकेला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 👉 या विषयाशी संबंधित तुमचे अनुभव, मते किंवा सूचना आम्हाला जरूर पाठवा. 👉 तुमच्या कथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. 👉 चला, मिळून समाजाचा दृष्टिकोन बदलूया! 📩 तुमचे अनुभव आम्हाला पाठवा आणि या बदलाचा भाग बना.– *संघर्ष योद्धा न्यूज टीम*







