अकलूजचे समाजसेवक वजीर शेख यांना महात्मा फुले महाराष्ट्र रत्न पुरस्कार .कोरोना काळातील सेवा आणि सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय सन्मान
अकलूज – अकलूज येथील मुस्लिम समाजाचे नेता आणि माजी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्य सेलचे जिल्हा अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक विभागाचे राज्य सरचिटणीस, मा. वजीर रहिमहुल्लाह शेख यांना आहिल्यानगर येथे महात्मा फुले महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान सायलीताई धनाबाई आणि प्रसिद्ध आदर्श समाजसेवक ज्योतीषाचार्य दिपक दिक्षित यांच्या हस्ते हॉटेल गोल्ड रोज येथे दिला
गेला.मा. वजीर शेख यांनी कोरोना महामारीच्या काळात रुग्ण आणि गरजू लोकांसाठी केलेली अतुलनीय सेवा, तसेच मौलाना आझाद महामंडळाद्वारे ६००० लोकांना केलेले कर्जवाटप, आणि अकलूज येथील स्थानिक पातळीवर केलेले सामाजिक व राजकीय कार्य यामुळे हा पुरस्कार मिळवला.
या यशामुळे समाज आणि राजकीय क्षेत्रात वजीर शेख यांचे कौतुक होत असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा सर्व स्तरातून होत आहे.







