• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूज-वेळापूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा:अपघातांची मालिका, नागरिक भयभीत

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 16, 2026
in आपले शहर
0
अकलूज-वेळापूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा:अपघातांची मालिका, नागरिक भयभीत
0
SHARES
222
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

क्रमशः भाग -2.

अकलूज-वेळापूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा:अपघातांची मालिका, नागरिक भयभीत

​अकलूज:(प्रतिनिधी)अकलूज ते वेळापूर या मार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. या महत्वाच्या मार्गांवर सतत होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता आता ‘मृत्यूचा सापळा ‘ठरत आहे.

गेल्या काही महिन्यांत या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत.

प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.या रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघात होत आहेत. अपघात झाल्यानंतर काहींना इजा होत आहे. गोरगरीब नागरिकांना नाहक दवाखान्यात जावे लागत आहे. विनाकारण आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे.यात बहुतांश दुचाकी वाहन धारकांचे जास्त प्रमाण आहे.वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, हा रस्ता आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​अपघातांची मालिका आणि प्रमुख कारणे

​या मार्गावर वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः साखर कारखान्यांच्या हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असते.​रस्त्यावरील जीवघेणे खड्डे: रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत​

अपुऱ्या उपाययोजना:

धोकादायक वळणांवर कोणतेही दिशादर्शक फलक, पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर्स उपलब्ध नाहीत.​अरुंद रस्ता: वाहनांची संख्या वाढली असली तरी रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने ओव्हरटेकिंगच्या नादात समोरासमोर धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे.

अकलूज–वेळापूर रस्त्यावरील अपघातांच्या क्लिष्ट घटना:

पूर्वीच्या काही घटनांमध्ये अकलूज–वेळापूर रस्त्यावर दुचाकी व कंटेनर/वाहनांचा भीषण अपघात, झाला होता.ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, �• याच रस्त्यावर 2021 मध्ये एक अपघात झाला होता ज्यात पालक व लेकीचा जागीच मृत्यू झाला, आणि मुलगा जखमी ठरला होता. �• 2024 मध्ये अकलूजमधील प्रतापसिंह चौकाजवळ बस आणि स्कूटीचा अपघात, ज्यात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, . �दोन वर्षांपूर्वी अकलूज येथील रहिवाशी व वेळापूर येथे येथील गॅरेज मालकाच्या दुचाकीला समोरून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षात या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यात अनेकांचा नाहक बळी गेले आहेत.काही घरातील कर्ते पुरुष या अपघातात बळी गेले आहेत.अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

अशा घटना या मार्गांवरील धोक्याची साक्ष देतात.याला जबाबदार कोण?​

प्रशासनाकडून केवळ आश्वासने?

​प्रत्येक मोठ्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून दुरुस्तीचे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. खड्डे भरण्याचे काम केवळ थातूरमातूर केले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.​

नागरिकांची मागणी​

“आम्ही रोज जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करतो. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती बळी हवेत?” असा संतप्त सवाल एका नियमित प्रवाशाने व्यक्त केला.

या मार्गाचे तातडीने चौपदरीकरण करावे, ब्लॅक स्पॉट्सवर गतिरोधक बसवावेत आणि रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.​

थोडक्यात पण महत्त्वाचे:

प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास, परिसरातील संतप्त नागरिक येत्या काळात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

क्रमशः :-भाग -2

.🚧 🚨 अकलूज – वेळापूर रस्ता ! संघर्ष सुरु 🚨🚧 १५ फेब्रुवारीपासून संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलने या रस्त्यावरील अडचणी उघडून सांगणारी वृत्तमालिका सुरू केली आहे.👥 नागरिक म्हणतात – “प्रत्येक दिवशी प्रवास हा दुःस्वप्न!”⏳ दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत🙏 अनेकांनी आभार व्यक्त केले – ‘कुणीतरी आमच्या अडचणी ऐकल्या!’🔥 आम्ही थांबणार नाही! रस्ता पूर्ण होईपर्यंत सातत्याने वृत्त प्रकाशित करत राहू!➡️ तुमच्या अनुभवांची माहिती द्या, समस्या, अनुभव सांगा.–

📲 ७८४१८४७४५८.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
निमसाखर मध्ये यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने.रक्तदान शिबिरातून अजितदादांना वाहणार आदरांजली

निमसाखर मध्ये यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने.रक्तदान शिबिरातून अजितदादांना वाहणार आदरांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In