शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महा शिबिराचे दि 18 जानेवारी 2026 रोजी गंगाखेड जिल्हा परभणी ते आयोजन – प्राजक्ता प्रताप गायकवाड
परभणी प्रतिनिधी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी तालुका विधी सेवा समिती गंगाखेड तसेच जिल्हा प्रशासन परभणी यांचे संयुक्त विद्यमाने 18 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री संत जनाबाई महाविद्यालय केंद्री रोड गंगाखेड येथे विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
महामेळाव्याचा मुख्य उद्देश जेष्ठ नागरिकांच्या योजना व वैद्यकीय तपासणी हा असून त्या व्यतिरिक्त समाजातील इतर दुर्बल वंचित घटकांना शासकीय कार्यालयातील विविध लोक कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करणे तसेच त्यांचा लाभ मिळवण्यासाठी कायदेविषयक जनजागृती करणे हा आहे परभणी जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय विभाग अंतर्गत त्यांच्या कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजनांबाबत माहिती व लाभ देणे करता महा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
न्यायमूर्ती संदीप कुमार सि मोरे आणि न्यायमूर्ती संजय ए देशमुख उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजी नगर तथा पालक न्यायाधीश परभणी जिल्हा यांच्या शुभहस्ते महा शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे परभणी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा उज्वला एम नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनानुसार हा काय्रक्रम पूर्ण होणार आहे
परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नितिशा माथूर यांच्या उपस्थितीमध्ये महा शिबिर होणार आहे
परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी या महा शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांबाबत माहिती करून घ्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणीचे सचिव भूषण काळे आणि गंगाखेड वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद शिरसागर यांनी केले आहे
अशी माहिती प्राजक्ता प्रताप गायकवाड यांनी आमच्याकडे दिली आहे







