आय चॅम्प अबॅकस प्रा. ली.तर्फे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी) –


आय चॅम्प अबॅकस प्रा. ली. यांच्या वतीने भव्य राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक विशाल माने व स्नेहल माने यांनी दिली.
या स्पर्धेसाठी देशभरातून ४०० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. स्पर्धेची परीक्षा १८ जानेवारी रोजी बायपास रोड, अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हॉल येथे ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे.

तर बक्षीस वितरण समारंभ १ फेब्रुवारी रोजी स्मृतिभवन, शंकनगर, अकलूज येथे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.या स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.

तसेच स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल ठेवण्यात आली असून त्यामध्ये –आय चॅम्प अबॅकस सुपरस्टार – १५ ट्रॉफीसुपर इंटेलिजेंट चॅम्प – ५० ट्रॉफीप्रथम क्रमांक – ८० ट्रॉफीद्वितीय क्रमांक – ८० ट्रॉफीतृतीय क्रमांक – ८० ट्रॉफी३ सायकल, ५ स्मार्ट वॉच याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तरी या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –📞 ९६८९८ ३७९००, ७२१८१ ००९००







