• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

आयपीएलची आठवण अकलूजच्या एमडीपीएलने जागी केली..डॉ.बाहुबली शाह अकलूज येथे महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमिअर लीग २०२६ उत्साहात संपन्न… अहिल्यानगर ११ संघ विजेता, पुण्याच्या डीएसपी रोडे वॉरियर्स संघाला उपविजेतेपद

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
January 9, 2026
in क्रीडा
0
आयपीएलची आठवण अकलूजच्या एमडीपीएलने जागी केली..डॉ.बाहुबली शाह                                      अकलूज येथे महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमिअर लीग २०२६ उत्साहात संपन्न…                                       अहिल्यानगर ११ संघ विजेता, पुण्याच्या डीएसपी रोडे वॉरियर्स संघाला उपविजेतेपद
0
SHARES
159
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

…आयपीएलची आठवण अकलूजच्या एमडीपीएलने जागी केली..डॉ.बाहुबली शाह अकलूज येथे महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमिअर लीग २०२६ उत्साहात संपन्न… अहिल्यानगर ११ संघ विजेता, पुण्याच्या डीएसपी रोडे वॉरियर्स संघाला उपविजेतेपद

अकलूज (प्रतिनिधी )

:दि.७ जाने.२०२६ रोजी सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व मिशन आयुर्वेदा, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमिअर लीग, अकलूज २०२६ (पर्व ४) ही भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा यावर्षीही मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या क्रीडा संकुल,अकलूज येथे पार पडली.

चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून पुरुष व महिला डॉक्टरांच्या क्रिकेट संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या स्पर्धेत सातारा, अकलूज, माळशिरस, पुणे, बारामती, अहिल्यानगर, बीड, परभणी,मोहोळ व उमरगा येथील संघ सहभागी झाले होते. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा व रोमांचक ठरला. खेळाडूंनी सादर केलेल्या दर्जेदार खेळामुळे प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अहिल्यानगर ११ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.डीएसपी रोडे वॉरियर्स, पुणे संघाने उपविजेतेपद मिळवले, तर बारामती सुपरकिंग्स संघाने तृतीय क्रमांक पटकावला तर अकलूजच्या संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

वैयक्तिक कामगिरीच्या आधारे मॅन ऑफ द सिरीज म्हणून डॉ. मासाळ सुरज, बेस्ट बॅट्समन डॉ. प्रमोद पवार, बेस्ट बॉलर डॉ. गुड्डू शेख, तर बेस्ट विकेट कीपर म्हणून डॉ. शकील पठाण यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा, भारतीय जनता पार्टी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, मनसे डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजय तायडे पाटील, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतीश दोशी, सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राजीव राणे, निमाचे ज्येष्ठ नेते डॉ. तानाजी कदम, केंद्रीय निमा संघटनेचे सदस्य डॉ. मिलिंद गुळभीले, डॉ.पृथ्वीराज माने पाटील,डॉ.श्रद्धा जवंजाळ, डॉ.वैष्णवी शेटे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. उदय माने देशमुख, डॉ. दादासाहेब पराडे, होमिओपॅथीक संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ. अभिजित राजे भोसले, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड ,शंकर पवार, डॉ.मिलिंद हिंगमिरे,,डॉ.तुषार माने आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

प्रास्ताविकात आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी डॉक्टरी पेशा हा नेहमी ताण तणावाचा राहिला असून डॉक्टरांनी पेशा सांभाळताना रुग्णांना फक्त सल्ले न देता स्वत व्यायामाकडे ,शरीराकडे लक्ष दिले पाहिजे याहेतूने सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन व मिशन आयुर्वेद गेल्या पाच वर्षापासून ग्रामीण भागात फक्त डॉक्टरांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करत आहे.याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करण्याचे सामाजिक काम करते असे सांगितले.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमियोपॅथीचे प्रशासक डॉ.बाहुबली शाह यांनी सांघिक खेळ पाहून आयपीएलची आठवण आल्याचे सांगितले. तसेच व्यायामाचे महत्त्व सांगत संघटनेने केलेल्या कामाचे कौतुक करत यावर्षीपासून विजेत्या संघास द्वितीय बक्षीस देण्याचे जाहीर केले

.भाजपा डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब हरपळे यांनी एमडीपीएल आयोजकांचे अभिनंदन करत स्पर्धा आयोजनांमध्ये सातत्य राखत अकलूजची स्पर्धा ही राज्यस्तरीय राहिली नसून ती देशपातळीवर पोहचली असल्याचे सांगितले.मनसे डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अजय तायडे यांनी दिवसेंदिवस ही स्पर्धा अधिक जोमाने सुरू असल्याचे सांगत या वर्षी विजेत्या अहिल्यानगर संघाचा गतवर्षी पराभव झाला होता,त्यावेळी संघाचे कप्तान डॉ.शंकर वंजारी यांनी चॅलेंज दिले होते की पुढच्या वर्षी आम्ही जिकणार याची आठवण करून दिली.तसेच डॉ.सतीश दोशी, डॉ.मिलिंद गुळभिले, डॉ.श्रद्धा जवंजाळ, डॉ.प्रवीण पाटील,निमाचे डॉ.प्रताप सोमवंशी आदीनी आपल्या मनोगतात संघटनेच्या कामाचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेदरम्यान सर्व सहभागी संघांसाठी उत्तम भोजन व निवासाची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती. पराभूत संघ जरी अल्प फरकाने पराभूत झाले असले, तरी त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली.स्पर्धेत राज्यभरातून डॉक्टर्स सहभागी झाले होते तसेच या स्पर्धा युट्यूब वरून प्रसारित करण्यात आल्या होत्या.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. अनिल बळते, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ. नितीन कुबेर, डॉ. प्रशांत निंबाळकर, डॉ. नागनाथ दगडे, डॉ. अनिस शेख व डॉ. फैज सय्यद , डॉ.छाया दगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर संघांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक भव्य व जोमाने आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
बागेचिवाडी गावतील युवक कृष्णा (भैय्या) एकनाथ वाघ याचे अपघाती निधन

बागेचिवाडी गावतील युवक कृष्णा (भैय्या) एकनाथ वाघ याचे अपघाती निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!