…शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी खेळ महत्वाचा….डॉ.विलास हरपले
अकलूज ..









दि.1 जाने रोजी सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन व मिशन आयुर्वेद, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग अकलूज सत्र 4 चे उद्घाटन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.अध्यक्ष तथा महिला होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विलास हरपळे, शिवआरोग्य सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ.किशोर ठाणेकर,अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे,सोलापूर जिल्हा होमियोपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.कालिदास लिमकर,केंद्रीय निमा संघटनेचे सदस्य डॉ तानाजी कदम ,म्हसवडचे मा.नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ,केंद्रीय निमा संघटनेचे सदस्य डॉ सुधीर पोफळे ,डॉ.विठ्ठल कवितके,डॉ.राहुल जवंजाळ,डॉ.सुहास राऊत यांच्या हस्ते क्रीडा संकुल,अकलूज येथे संपन्न झाले.

उद्घाटनपर भाषणात डॉ.विलास हरपळे यांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी खेळ महत्त्वाचा असल्याचे सांगितले.मी ७५ वर्षांचा असूनही आजही कबड्डी खेळत असल्याचे सांगत डॉक्टरानी आपल्या व्यस्त वेळापत्रकात बदल करून कोणताही खेळ खेळल्यास आरोग्य चांगले राहते असा मूलमंत्र दिला. तसेच सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन व मिशन आयुर्वेद या आयुष संघटनांनी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा अकलूजला आयोजित केल्या त्याबद्दल अभिनंदन करत स्पर्धेतील पहिले बक्षीस देण्याचे जाहीर केले.बार्शीचे जेष्ठ होमियोपॅथिक तज्ञ डॉ.कालिदास लिमकर यांनी क्रिकेट हा खेळ श्री कृष्ण यांच्या काळातील असल्याचे सांगत धावपळीच्या जीवनात मनावरील ताण हलका करण्यासाठी खेळाकडे लक्ष केंद्रित करावे असे म्हटले शिव आरोग्य सेनेचे डॉ.किशोर ठाणेकर यांनी मानसिक व शारीरिक स्वास्थासाठी रात्रीचे मित्र कमी करून सकाळचे मित्र वाढविण्याचा सल्ला दिला.

म्हसवडचे मा.नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ यांनी स्पर्धेच्या जगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, संघटनेने पुढाकार घेऊन डॉक्टरांनी सुद्धा आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी जनजागृती म्हणून क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

केंद्रीय निमा सदस्य डॉ सुधीर पोफळे यांनी अकलूज सारख्या ग्रामीण भागात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र मधून डॉक्टर्स एकत्र करून अश्या पद्धतीची स्पर्धा घेणे हे सोपे काम नसून ते या आयोजन समितीने सलग4 वर्ष हे करून दाखवले हे खरोखर कौतुकास्पद आहे त्याबद्दल कौतुक केले प्रास्ताविकात आयोजन समितीचे प्रमुख डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी धावपळीच्या व्यस्त जीवनात शरीराकडे डॉक्टर्स मंडळीनी लक्ष द्यावे तसेच संघ भावना जपली जावी यासाठी महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धागेल्या चार वर्षापासून मिशन आयुर्वेद व होमियोपॅथिक डॉक्टर्स संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित केल्या असल्याचे सांगितले
.तसेच संघटनेच्या वतीने दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे,आरोग्यावर चर्चासत्र आयोजन, अडचणीच्या काळात डॉक्टरांना मदत केली जाते असे सांगितले.यावेळी द्वारकाधीश सेवाभावी संस्था आनंदनगरच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले
यावेळी म्हसवडच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ.सविता मासाळ, डॉ.विठ्ठल कवितके,आयएमएचे अध्यक्ष डॉ.संजय सीद,माढा निमाचे मा.अध्यक्ष डॉ.पांडुरंग गायकवाड,निमाचे माळशिरस तालुका अध्यक्ष डॉ.अमोल माने, माळशिरस निमा चे माजी अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे, डॉ.जे.के.चव्हाण, डॉ.उदय माने देशमुख, डॉ.जयंत चव्हाण, डॉ.तुळशीदास रूपनवर, डॉ.दिलीप पवार,सहारा नर्सिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राहुल जवंजाळ,माळशिरस तालुका होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजे भोसले, डॉ.जयंत शिंदे, माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड,आनंद चव्हाण,एकतपुरे,डॉ. विजय खाडे,सौ.स्वाती खाडे,डॉ.सौ.कोमल गायकवाड , डॉ.अभिजीत शेंडगे,द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव गायकवाड,सचिव नामदेवराव गायकवाड,ऋषिकेश गायकवाड,प्रवीण पाटील, डॉ अमित गायकवाड ,, डॉ शिवाजी पणासे , डॉ पंकज नलवडे डॉ.नवनाथ बंडगर इ.उपस्थित होते.या स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या संघाची निवड करण्यात आली
यामध्ये उमरगा,परभणी,बीड,कोल्हापूर,अहिल्यानगर,बारामती,पुणे,अकलूज,मोहोळ,सातारा या जिल्ह्यातील संघाचा समावेश होता.या स्पर्धेचे यूट्यूबवर लाईव्ह प्रसारण करण्यात येते आज झालेल्या सामन्यात बारामती, सातारा अकलूज हे संघ विजयी झाले.
प्रारंभी पाहुण्याचे स्वागत व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिशन आयुर्वेदाचे अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन गायकवाड, डॉ.अनिल बळते, डॉ.नागनाथ दगडे, डॉ.नितीन कुबेर, डॉ.फैज सय्यद,महिला क्रीडा विभाग प्रमुख डॉ.छाया दगडे,डॉ.अनिस शेख यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत निंबाळकर यांनी केले.







