वनविभागाने जप्त केलेलं वाहन बेपत्ता, अकलुज मधील घटना,वनपालाचा हालगर्जीपणा नडला..
अकलुज/प्रतिनिधी
अवैध वृक्षतोड करुन वाहतुक करताना पकडलेला ट्रँक्टर ट्राँली कारवाई करण्यात अगोदरच गायब झाली.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन वाहन गायब होण्याचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माळशिरस वनविभागाचे कर्मचारी गस्त करताना अकलुज बायपास रस्त्यावर त्यांना दि.१९ रोजी लिंब,भोकर,सुभाष आदी अंदाजे दोन टन लाकडांची अवैद्यपणे वाहतूक करणारा ट्रँक्टर व ट्राँली दिसली. कारवाई साठी ते वाहन अकलुज येथील सहारा साँमिल मालकाच्या ताब्यात देवुन वनपाल सावंत यांनी वरीष्ठांना फोन केला.वरीष्ठांनी संबधीत लोकांना घेवुन येण्यास सांगितले.सर्वजण वरीष्ठांकडे जात असताना ट्रँक्टर ड्रायव्हर अर्ध्या रस्त्यातच उतरला आणि त्याने वाहन पळवुन घेवुन गेल्याचे खात्रीशीरपणे सांगण्यात येत आहे.
तसे पाहता वाहन ताब्यात दिल्यानंतर ताबा पावती घेणे गरजेचे असते.मात्र अधिकाऱ्यांचा हालगर्जीपणा नडला आणि पुराव्यासह पकडलेले वाहन दिवसा ढवळ्या गायब करण्यात आल्याची चर्चा होत आहे.त्याचप्रमाणे काही साँमालच्या बाहेर अवैध लाकडे पडलेली आहेत.त्याकडे वनविभागाची डोळेझाक तर होतच आहे, मात्र काही वेळेस गुन्हा नोंद करुन जप्त केलेली लाकडे जातात कुठे?असा संतप्त सवाल वृक्ष प्रेमी करत आहेत.







