अकलूज ते श्रीक्षेत्र आदमापुर एसटी चालू करण्याची मागणी
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज परिसर धनगर समाजाच्या वतीने अकलूज ते श्रीक्षेत्र आदमापुर एसटी चालू करण्यासाठी अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी लक्ष्मीकांत दगडू वाघे, संजय काका पिसे,निलेश ठोंबरे, नागेश्वर पोटे, अज्ञानराव मोटे, विशाल काळे, महेश वगरे, बबन चोरमले,प्रकाश शेठ मासाळ, आनंद हंडाळ, तात्यासाहेब नायकुडे, परशुराम माने,आकश कोळेकर, सुनील बापू पिसे,अॅड स्वपनील भैय्या होणमाने,गणेश श्रीराम,महादेव देवकाते, अजय गडदे व इतर अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
या वेळी आगार प्रमुख अकलूज आगार यांनी येत्या शनिवारी प्रायोगिक तत्त्वावर बस सुरू करण्याचे आश्वासन दिले.







