अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी गणेश कदम यांची नियुक्ती

अकलूज (प्रतिनिधी )अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या माध्यमातून आजपर्यंत अनेक आंदोलन, उपोषण करण्यात आली आहेत.
अनेकांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शन खाली ही संघटना कार्यरत आहे.
अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी या पदावर राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल दादा देसले यांनी नियुक्ती केली असून, कदम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना कदम यांनी सांगितले की,संघटना वाढीसाठी व प्रचार प्रसार करण्या बरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल नातेवाईक, मित्रमंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







