• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home महाराष्ट्र

सीसीएमपी पास होमियोपॅथिक डॉक्टरांची एमएमसीत नोंदणी करणार …मा.राजेशजी पांडे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
November 18, 2025
in महाराष्ट्र
0
सीसीएमपी पास होमियोपॅथिक डॉक्टरांची एमएमसीत नोंदणी करणार …मा.राजेशजी पांडे
0
SHARES
850
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीसीएमपी पास होमियोपॅथिक डॉक्टरांची एमएमसीत नोंदणी करणार …मा.राजेशजी पांडे

पुणे…(प्रतिनिधी )

रविवार दि.१६ रोजी सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व डेक्कन हर्डीकर हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मेगाहोमोयोकॉन 2025 चे आयोजन होमियोपॅथीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी करण्यात आले होते.मेगाहोमोयोकॉन 2025 चे उद्घाटन डॉ.राजेशजी पांडे (प्रदेश सरचिटणीस भाजपा, महाराष्ट्र) यांच्या हस्ते व होमियोपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी उद्घाटनपर भाषणात मा.राजेशजी पांडे यांनी होमियोपॅथिक डॉक्टरांनी संशोधनावर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. होमियोपॅथीमुळे अनेक असाध्य रोगांवर मात करता येते.उपचार पद्धती ही स्वस्त , सुरक्षित आणि प्रभावी असून मी सुद्धा जळगावचे डॉ.जसवंत पाटील यांच्या सल्ल्यानुसार होमियोपॅथिक औषधे घेत असल्याचे सांगितले.होमियोपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंभित मागण्यासाठी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,मा.अजितदादा पवार यांच्या समवेत बैठक आयोजित करून पाठपुरावा करतो असे सांगितले

.प्रास्ताविकात सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी होमियोपॅथीक वैद्यकीय व्यावसायिक ताठ मानेने जगला पाहिजे,होमियोपॅथि ही लोकाश्रयावर टिकून असून राजाश्रयासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.राजेशजी पांडे यांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.सीसीएमपी संघटनेच्या कामाचा विस्तार करण्यासाठी तालुका स्तरावर काम सुरू आहे.होमियोपॅथीच्या विकासासाठी पूर्वीच्या काळात काम केलेल्या लोकांच्या स्मृती जतन करण्यासाठी होमियोपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे सर यांच्या कल्पनेतून यावर्षीपासून जेष्ठ डॉक्टर्स यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अरुण भस्मे यांनी सीसीएमपी कोर्स विद्यापीठात सुरू करण्यासाठी वैद्यकीय विकास मंचाचे प्रभारी राजेशजी पांडे यांनी मोलाचे योगदान दिले असून आता एमएमसी मध्ये नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले. संघटनेने होमियोपॅथि शास्त्राच्या विकासासाठी कार्य केलेल्या महान व्यक्तीच्या नावे पुरस्कार देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले

.एमसीएचचे प्रशासक डॉ.बाहुबली शाह यांनी सीसीएमपी पास झालेल्या डॉक्टरांना एमएमसी नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी राजेशजी पांडे यांनी पुढाकार घ्यावा असे सांगत होमियोपॅथिचा प्रचार व प्रचार करण्यासाठी सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.एमसीएचचे मा.प्रशासक डॉ.सोमनाथ गोसावी यांनी होमियोपॅथिक सीसीएमपी पास डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणी साठी महाराष्ट्रातील सर्व होमियोपॅथिक डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी पुण्याचे जेष्ठ होमियोपॅथिक तज्ञ डॉ.संजीव डोळे यांनी संधिवातावर होमियोपॅथिक उपचार,बारामतीचे एच एच एफ वक्ते डॉ.ज्ञानेश्वर पवार यांनी त्वचा विकारावर होमियोपॅथिक उपचार ,लहानमुलांच्या आजारावर होमिओपॅथिक उपचार पुण्याच्या बालरोग होमियोपॅथि तज्ञ डॉ.रुची शिरूडकर तर डेक्कन हर्डीकर हॉस्पिटल पुणेचे प्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉ.सचिन नागपूरकर यांनी हाडांच्या समस्येवर होमियोपॅथिक उपचार प्रभावी ठरतात असे सांगितले.सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने दिले जाणारे 2025 चे पुरस्कार पुढीलप्रमाणे डॉ.रंगनाथ गोपाळ कवीश्वर जीवन गौरव पुरस्कार जगातील पहिले होमियोपॅथि पीएचडी धारक डॉ.हरी घोलप, डॉ.रामकृष्ण महादेव चिंचोळकर जीवन गौरव पुरस्कार वाशीचे नवी मुंबई आदित्य नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ.प्रतिक तांबे, डॉ.डी.व्ही.निकम जीवन गौरव पुरस्कार पुण्याचे प्रसिद्ध होमियोपॅथिक तज्ञ डॉ.संजीव डोळे, डॉ.एल.आर.भोसले जीवन गौरव पुरस्कार एमसीएचचे मा.अध्यक्ष डॉ.अजित फुंदे पाटील अहिल्यानगर,डॉ.वामनराव बापूजी डहाणे जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ होमियोपॅथिक तज्ञ डॉ.शंकर कटेकरी, डॉ.मिलिंद राव जीवन गौरव पुरस्कार बारामतीचे डॉ.ज्ञानेश्वर पवार तर डॉ.प्रफुल्ल विजयकर जीवन गौरव पुरस्कार पुण्याच्या डॉ.रुची शिरूडकर यांना मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.डॉ.सॅम्युअल हनेमान जीवन गौरव पुरस्कार डॉ.राजेश सातपुते (कोल्हापूर), डॉ.दीपक मोटे (नांदेड), डॉ.जयदीप चव्हाण (सातारा), डॉ.योगेश जोग (रत्नागिरी), डॉ.योगेश ढेंबरे (जालना), डॉ.अनिल भांडवलकर (पुणे), डॉ.सौ.अपेक्षा महाबळेश्वर (सांगली), डॉ.देविदास चव्हाण (गंगाखेड,परभणी),डॉ.मुकेश तांदळे (छत्रपती संभाजीनगर) व डॉ.आदित्य अहिरे (डहाणू,पालघर) यांना मान्यवरांचे शुभ हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी डेक्कन हर्डीकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रचित दापकेकर, एनसीपी डॉक्टर्स सेलचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुनील जगताप,सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे संघटनेचे प्रदेश सचिव डॉ.अजय तायडे,उपाध्यक्ष डॉ.अमित भस्मे,सदस्य डॉ.सतीश आवळे, डॉ.नागनाथ दगडे, डॉ.नितीन कुबेर, डॉ.अनिल बळते,आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.दयानंद पवार,उपाध्यक्ष डॉ.फैझ सय्यद,खजिनदार डॉ.अपर्णा तायडे पाटील,सदस्य डॉ.ओम पाटील, डॉ.मयूरेश देशपांडे,एनसीपी डॉक्टर्स सेलचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हेमंत ठुसे, डॉ.संतोष पवार, डॉ नितीन राठोड,डॉ.राजेश बर्डे,डॉ.अभय मुथा,डॉ.शशिकांत कदम ,वर्षुकेत बिरादार इ.उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.मधू राव, डॉ.नवाज हडफा, डॉ.अल्फिया शेख यांनी केले तर आभार सीसीएमपी होमियोपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव डॉ.अजय तायडे पाटील यांनी मानले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या!                                                                                      २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्या! २ हजार रुपयांचा बोनस अपुरा असल्याचे सांगत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

October 16, 2026
एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार!      ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही
महाराष्ट्र

एसटी प्रवासातील सवलतीला आता ‘NCMC’चा आधार! ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य; कार्डशिवाय सवलतीचे तिकीट मिळणार नाही

August 31, 2026
आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे
महाराष्ट्र

आपत्कालीन वैद्यकीय सेवा अभ्यासक्रम हा केवळ शैक्षणिक प्रवास नव्हे, तर मानवी जीवन वाचविण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प — डॉ. अरुण भस्मे

August 29, 2026
कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
महाराष्ट्र

कंडेन्स मिल्क प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ : खा. धैर्यशील मोहिते-पाटील

August 25, 2026
🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र

🌹 नेतृत्व, संघर्ष आणि माणुसकीचा प्रेरणादायी प्रवास 🌹कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्व विद्याताई माने -साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

August 24, 2026
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच
महाराष्ट्र

२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

August 23, 2026
Next Post
अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५१ उमेदवारांचे सदस्य पदासाठी अर्ज दाखल तर नगराध्यक्ष पदासाठी ७ अर्ज दाखल.

अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५१ उमेदवारांचे सदस्य पदासाठी अर्ज दाखल तर नगराध्यक्ष पदासाठी ७ अर्ज दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In