अकलूज पंचक्रोशीतील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के. इनामदार यांची व माझी ओळख १९८८ मध्ये ! नोकरीच्या निमित्ताने मी १९८७ मध्ये येथील शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो.

मी मुळात उपक्रम उपक्रमशील असल्यामुळे २८ फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या निमित्ताने एक उपक्रम राबवण्यासाठी मी काही गण्य व्यक्तींच्या शोधात होतो. तेव्हा इनामदार डॉक्टर यांची ओळख झाली. त्यांना माझ्या महाविद्यालयात प्राध्यापक कर्मचाऱ्यांसाठी “हृदयाघातचे लक्षणे व उपाय” या विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.
सर या कार्यक्रमाला उपस्थित राहून अगदी ओघवत्या व सरळ समजेल अशा भाषेतून विषयावर व्याख्यान दिले. तेव्हापासून माझी व डॉक्टरांची मैत्री जुळून आली; तसेच आजतागायत आमच्यातील संवाद- संपर्क टिकून राहिला आहे.

मी अकलूज मध्ये आलो त्यावेळी (१९८७) इनामदार सर गांधी चौकात एक छोट्याखानी कन्सल्टन्सी चालवत रुग्णसेवा देत होते. काळानुरूप होणाऱ्या बदलांच्या बळावर पुढे गुणकारी उपचार देत सर नावलौकिक मिळविले. रुग्णसेवा पुरविण्यात जाग कमी पडत गेल्यावर गरजेनुसार संग्रामनगर या ठिकाणी १९९१ साली ‘अश्विनी हॉस्पिटल’ या नावाने मल्टी स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात आले. सरांच्या सहवासात मी राहून सरांचे सूक्ष्म हालचालींचा मी अभ्यास करत आलो. भारतीय संस्कृतीत रुग्ण डॉक्टरांना देव मानतात आणि खरंच डॉ. इनामदार सर हे पंचक्रोशीतील रुग्णांना विशेष करून हृदयाघाताचे व सर्पदंशाच्या आणि अपघातात सापडलेल्या रुग्णांना देवच ठरले आहेत. रुग्णांशी सुसंवाद संवाद साधणे, रुग्णांना मानसिक आधार देणे, रूग्ण बरे होण्यास रुग्णांच्या नातेवाइकांना दवाखानाच्या खर्चाची पूर्वकल्पना देणे, झालेल्या खर्चामध्ये भरघोश सवलत देणे, नातेवाईकांशी सामंजसाने संवाद साधणे इत्यादी कौशल्याने सर गरुडभरारी घेत वैद्यकीय क्षेत्रात अप्रतिमा कार्यरत होत गेले;
परिणामी माळशिरस तालुक्यात काय तालुक्याला लागून असलेले इंदापूर, फलटण, सांगोला, माढा किंबहुना पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील भागातील रुग्णांची व या दवाखान्यात उपचाराला येतात. सरांनी आपली ख्याती किंवा प्रसिद्धी तेज गतीने वाढावी असा प्रयत्न कधीच केलेला नाही. जे रुग्ण अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बाहेर पडले आहेत ते स्वतः व त्यांच्या नातेवाईकांनी नकळत इनामदार सरांची कार्याचे वैखरी प्रसारित करत गेले. डॉक्टर इनामदार हे खरंच देवदूत ठरले आहेत. त्यांच्याकडून अविरत रुग्णसेवा सतत घडत राहो अशी अपेक्षा बाळगून वयाचे ७३ वर्षे पूर्ण करून ७४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या डॉ. इनामदार यांना उदंड आयुष्य लाभो ही अभिष्टचिंतन!! *प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, अकलूज*








