सोलापूर/ प्रतिनिधी भैय्या खिलारे :
मार्च २०२५ याकालावधीत बेस्ट पोलीस ऑफ द मंथ पुरस्काराकरीता म्हसवड पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस हवालदार मैना हांगे यांनी सर्वात जास्त भाग ५ व ६ च्या गुन्ह्यांची निर्गती करणे, दारु केसेस करणे, वरीष्ठ अर्जाची निर्गती करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळणे, गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस आणणे, साक्षीदार वेळेत हजर करणे, अशा कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात आले.सध्या त्यांच्याकडे भालवडी, रांजणी, वरकुटे, म्हसवड, माळवाडी, इंजबाव, भाटकी, हिंगणी, खडकी, तुपेवाडी, मोटेवाडी आणि देवापूरच्या बोट अंमलदार म्हणून चार्ज आहे. महिला पोलीस हवालदार यांना माहे डिसेंबर २०२५ या कालावधीत बेस्ट पोलीस ऑफ द मंथ पुरस्काराकरीता म्हसवड पोलीस स्टेशनकडून गौरवण्यात आलेल्या मैना हांगे या परिसरात कर्तव्यतत्पर व कामाशी प्रामाणिक म्हणून ओळखल्या जातात. गावा-गावातवाद विवाद होऊ नयेत यासाठी त्यांचे प्रबोधनात्मक काम सातत्याने सुरू असते. पोलीस स्टेशन दरबारी तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांनायोग्य ते मार्गदर्शन करून तक्रारींचा निपटारा करण्यात त्या हातखंडा आहेत.मिळालेला हा बहुमान पोलीसअधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रेरणेमुळे मिळाल्याच्या भावना त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी व्यक्त केल्या.






