*माळखांबी जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक अशोक पाटील यांचे वर्गात शिकवत असताना हृदय विकाराचे धक्क्याने निधन*
अकलूज (अकलूज)माळ कांबीकर येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक अशोक पाटील गुरुजी(वय 51वर्षे) यांचे 5 एप्रिल रोजी वर्गात शिकवत असताना हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.ते मुळचे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावचे होते.त्यांचेवर बोराळे येथे अंत्संस्कार करण्यात आले.
ते सुरूवातीला काही वर्षे श्रीपूर येथे आनंदनगर येथे रहायला होते.पाटील गुरुजी हे मनमिळाऊ व शांत स्वभाव असलेलं विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात.
त्यांच्या अकस्मात निधनाने माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.







