अकलूज येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढणेबाबत तहसीलदार यांचे भुमी अभिलेख माळशिरस यांना आदेश
अकलूज (प्रतिनिधी )मौजे अकलुज ता. माळशिरस येथील सिटी सर्व्हे नंबर १८३४ व १८३५ या शासकिय जागेवरील अतिक्रमणबाबत मुख्याधिकारी, अकलुज नगरपरिषद अकलुज यांनी दिनांक ०१/०४/२०२२ रोजी तहसीलदार यांना पत्र दिले होते.
त्यानंतर मुख्याधिकारी नगर परिषद अकलुज यांनी वरील संदर्भान्वये मौजे अकलुज येथील सिटी सर्व्हे नंबर १८३४ व १८३५ येथील स्थानिक नागरिकांनी पत्राशेड ठोकुन अतिक्रमण केलेले आहे. व शासकिय जमीनीचा वापर करीत असल्याचे पाहणी दरम्यान आढळुन आलेले आहे.
तरी वरील शासकिय जागेवरील अतिक्रमण काढणेकरीता आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे आदेश तहसीलदार यांनी भुमी अभिलेख माळशिरस यांना 14-02-2025रोजी आदेश दिले आहेत.






