सोलापूर जिल्हा युवा सेना प्रमुख गणेश इंगळे यांच्या प्रसंगावधान मुळे वाचले ऊसतोड मजूर महिलेचे प्राण अकलूज (प्रतिनिधी )सध्याच्या धावपळी च्या काळात जो तो आपलेच बघत असतो. आजूबाजूला काय चालले आहे. हे पाहण्यासाठी वेळ नसतो. जो तो पैसा, प्रसिद्धी, पक्ष, नेता, यात गुरफटलेला असतो. परंतु काही व्यक्ती मात्र या पलीकडे जाऊन माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. याचाच प्रत्यय शनिवारी 18जानेवारी रोजी आला.
सोलापूर जिल्हा युवा सेना प्रमुख सामाजिक कार्यकर्ते गणेश इंगळे यांना मित्राचा फोन आला.माळशिरस तालुक्यातील वाघोली येथे ऊस तोड करणारी महिलेच्या पोटात कळा येत आहेत. हे समजल्या नंतर गणेश इंगळे यांनी परिस्थिती चे गांभीर्य ओळखून कोणीही असो शेवठी जीव महत्वाचा आहे. ही शिकवण मनी बाळगून त्या महिलेला मदत केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की एक स्त्री बाळंतपण होण्याच्या मार्गावर होती. पण तिचा BP 190 असल्या कारणाने तिला अकलूज सरकारी दवाखान्यात ऍडमिट करून घेत नव्हते.कारण त्या हॉस्पिटल मध्ये ICU ची सुविधा नाही.त्यामुळे त्या मातेस सोलापूर ला घेऊन जाण्यास सांगितले आणी ते ही तात्काळ कारण त्या मातेस BP जास्त असल्या कारणाने झटके येण्याची शक्यता होती .इंगळे यांच्या मित्राने ही सर्व परिस्थिती सांगितली. आणी तुम्हांलाच सोलापूर ला घेऊन जावे लागणार आहे .
वास्तविक पाहता गणेश इंगळे हे 4 ते 5 दिवस मुंबई ला असल्या कारणाने त्यांची अनेक कामे पेंडिंग होती परंतु त्यांच्या .मनात एक विचार आला.आपलेच नाते वाईक असते तर किंवा आपल्याच घरातील किंवा आपल्याच भावकीतील कोणी माता असती तर सर्व कामे सोडून तिला सोलापूर ला नेले असते..भले ही माता आपली कोणी नाही परंतु एक जीव आहे आणी दुसरा जीव तिच्या पोटात आहे .हा विचार त्यांच्या मना मध्ये आला आणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण डोळ्या समोर आली साहेबांनी एक मुस्लिम सामाज्यातील व्यक्तीला मातोश्री मध्ये नमाज पडण्याच्या टाईमिंग ला मागचा पुढचा विचार न करता नमाज पडण्यास सांगितले
.त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन आपण एक शिवसैनिक आहे आणी मागचा पुढचा न विचार करता त्या मातेस सोलापूर ला नेले व सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. आणी ती माता जो पर्यंत बाळंत होत नाही तोपर्यंत ते थांबले..त्या मातेस मुलगी झाली ती मुलगी आणी ती माता एकदम सुखरूप आहे.
दरम्यान गणेश इंगळे यांनी दाखविलेल्या या प्रसंगावधान मुळे बाळ बाळंतीण सुखरूप राहिली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.







