महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे ,अध्यक्ष मा. श्री. बी. डी. ( आण्णा )पाटील ,दहिगाव जि.सोलापूर , वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने 6डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले असुन , अंत्यविधी पाटीलवस्ती , दहिगाव जि.सोलापुर येथे होणार आहे ,
आण्णा नावाने महाराष्ट्र भर परिचित असणारे काँग्रेस विचारधारा जपणारे नेते , अतिशय कष्टातुन , शिवाजी काँलेज ,(रयत शिक्षण संस्था ,सातारा ) येथून बी. ए बी. एड. ,पुर्ण करुन ,वालचंद विद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली ,परतुं सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या संपर्कात आल्याने समाज कार्यास सुरुवात केली .मा.नानासाहेब देशमुख यांच्या बरोबर शंकर सह.साखर कारखाना येथे संचालक म्हणून काम केले. एस.टी.महामंडळ व काँटन फेडरेशन व बोर्डिंग हाऊसचे संचालक म्हणून काम केले. गेली चाळीस वर्षे अहिंसात्मक मार्गाने खंडकरी शेतकऱ्यांचा लढा दिला.
जवळपास 25000एकर जमीन शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे कार्य केले.निर्व्यसनी, करारी, कडक शिस्त,अभ्यासू बाणा पण तितकाच हळवेपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन सुना,नातवंडे, दोन भाऊ,तीन भावजया,चार बहिणी, पुतणे व पुतण्या असा मोठा परिवार आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!







