सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे:
मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडुन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सीसीटीएनएस (क्राईम अॅण्ड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) (गुन्हा आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणाली) संगणक प्रणाली कार्यरत आहे. राज्य गुन्हे अन्वेषन विभागाद्वारे प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस प्रणालीच्या कामगिरीचा राज्यस्तरीय घटक निहाय आढावा घेण्यात येतो.
माहे ऑगस्ट २०२४ मध्ये सीसीटीएनएस प्रणालीच्या राज्यातील ५३ घटकांच्या मासिक कामगिरीचे मुल्यांकन केले असता, बात सांगली जिल्हा सन २०२४ मध्ये सातत्य राखत पहिल्या ३ क्रमांकामध्ये आहे. दैनंदिन प्रभावी वापरामध्ये व अचुकता राखण्यात, अद्यावत माहिती भरण्यात, नागरीकांच्या ई-तक्रारी इत्यादीबाबत जलदगतीनेनिर्गती केल्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलानेराज्यात ९८.१ टके गुण मिळवून ऑगस्टमहिन्यामध्ये प्रथम क्रमांक पटकविलेला आहे.
नागरीकांना कोणत्याही प्रकारेअसुविधा होणार नाही तसेचजिल्हयातील सर्व पोलीसठाण्याचे सर्व कामकाज है।आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरप्रभावीपणे करुन सर्व कामकाजहे ऑनलाईन पध्दतीने करण्यावरविशेष भर देण्याबाबत मा. पोलीसअधीक्षक संदिप पासे, मा. अपर पोलिसअधीक्षक रितु खोखर यांनी सर्व पोलीस ठाण्याचेप्रभारी अधिकारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन वसुचना दिल्या होत्या.
याच अनुषंगाने सांगलीजिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करतराज्यात सर्वाधिक गुण प्राम करुन प्रथम येण्याचाबहुमान प्राप्त केला आहे. यापुर्वी देखील सांगली जिल्हयाने तंत्रज्ञान आधारीत पोलिसींग करत कामात सातत्य ठेवून मार्च प्रथम क्रमांक, मे २०२४ प्रथम क्रमांक, जुन-२०२४ द्वितीय, जुलै-२०२४ तृतीय, व अशीच कामगिरी आणि यश ऑगस्ट २०२४ मध्ये दाखवुन पुन्हा प्रथम क्रमांक प्राम केला असुन कामगिरीत सातत्य राखले आहे.
याबाबत पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक रितु खोखर (नोडल ऑफीसर सीसीटीएनएस प्रणाली, सांगली) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पो.उप.नि. अफरोज पोलीसपठाण, नितीन महादेव बराले, सलमा उस्मानइनामदार विशेष दखल घेवुन सीसीटीएनएसप्रणालीच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवुन वेळोवेळी जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींवर अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना करून संबंधीत सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाज करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. यामुळेच सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगीरी करुन माहे ऑगस्ट २०२४ मध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. याकरीता व जिल्हातील सीसीटीएनएस प्रणाली संबंधाने कर्तव्य करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पो- लीस अधिक्षक रितु खोखर (नोडल ऑफीसर सीसीटीएनएस प्रणाली, सांगली) यांनी अभिनंदन केले आहे.







