सामाजिक बांधिलकी जोपासत मसाज थेरपी च्या माध्यमातून हजारो रुग्णांना दिलासा देणारा अवलिया- नितीन नेवसे
अकलूज (गणेश जाधव )


सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. कित्येक तासनतास एकाच जागी बसून काम केल्याने. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे, शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होत असल्याने आपल्याला अनेकदा त्रास होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी आता बॉडी मसाज हा उपाय अतिशय प्रभावी ठरत आहे.

आपल्याला धावपळीच्या या जगात मनाला आलेला एकटेपणा घालविण्यासाठी मसाज केल्याने दिलासा मिळत आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील केरबा संभाजी नेवसे यांनी काळाची गरज ओळखून आपणही समाजाचे काही देणे लागतो. ही सामाजिक बांधिलकी जोपासून 40वर्षांपूर्वी मसाज सेवा सुरु केली. घरोघरी जाऊन ते मसाज सेवा करतात.आपल्या आजोबांचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी आता त्यांचा नातू नितीन विलास नेवसे हा पुढे सरसावला आहे.
आपण सर्वांनी चार वर्षांपूर्वी कोरोना महामारी ला सामोरे गेलो आहोत. साधारणपने 2021च्या सुमारास परिस्थिती लक्षात घेऊन नितीन नेवसे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळात घरोघरी जाऊन मसाज सेवा सुरु केली. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.अनेकांना याचा फायदा झाला. तेव्हापासून त्यांनी ही मसाज सेवा सुरु ठेवली आहे.अगदी अल्प मोबदला घेऊन ते घरोघरी जाऊन मसाज सेवा करीत आहेत.
मसाजच्या माध्यमातून मणक्याचे आजार,मुरगळा,कंबर जखडणे,डोके दुखी,माण लचकणे, थकवा,अशक्तपणा,पोटदुखी,मुंग्या येणे अशा अनेक जुनाट आजारांवर ते आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवत आयुर्वेदिक 3डी मसाज करून उपचार करीत आहेत.यासंदर्भात अधीक माहिती देताना त्यांनी सांगितले की या मसाज मुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होत आहेत.
अभ्यंगम :-पूर्ण शरीराची चांगल्या प्रतिच्या तिळ तेलाने मालीश करून त्वचेतील शूष्कपणा कमी करून मुलायमपणा वाढतो. व तळपायाच्या भेगा मिळून येतात. तसेच जळजळ देखील थांबते. पादाभ्यंग :-कास्य थाळीने पायातील उष्णता खेचून काढणे,शिरोभ्यंग :-पूर्ण शरीराची, कमरेची मसाज करून शरीर थंड करणे, व थकवा दुर करून ताण कमी करणे, वातदोष :-हाताची व तळहाताची उष्णता कमी करून कास्यवाटीने मसाज करून वात खेचणे, पितदोष :-पायाच्या तळाची उष्णता कमी करून पित्त आटोक्यात ठेवणे, व निद्रानाशाची समस्या दुर करणे. दृष्टी:प्रसादं :-डोळ्यांच्या स्नायूंना व तेथील नसांना चालना मिळण्यासाठी हळुवार मसाज करणे. सौकुमार्य :-पूर्ण शरीर उच्च प्रतिच्या खोबऱ्याच्या तेलाने मसाज करून चेहरा कोमार्य अवस्थेत आणणे आणि आपल्याला सौकुमार्य उपलब्ध करून देणे. याशिवाय शरीरात असलेली शुगर (साखर )109%नियंत्रित ठेवणे आदी अनेक आजारांवर निश्चितपणे मसाज थेरपी चा उपयोग होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बॉडी मसाज केल्याने केवळ शरीरालाच नाही तर, मनालाही अनेक फायदे मिळतात. मानसिक आरोग्य सुधारते आणि त्यामुळे शरीरही सुदृढ होते.तणावापासून मुक्तीनियमित शरीर मालिश केल्याने कोर्टिसोलची पातळी कमी होते. खरं तर हा एक प्रकारचा हार्मोन आहे. ज्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो. बॉडी मसाज केल्याने तणावासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. मसाजमुळे शरीराचं दुखणं थांबत आणि मन रिलॅक्स होतं. दुखण्यात आराम मिळतो मसाजमुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते. हे जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ज्यामुळे तुम्हाला स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
नसा मोकळ्या होतात :-मसाज केल्याने शरीरातील अवघडलेल्या धमन्या मोकळ्या होतात. त्यामुळे ब्लॉक झालेल्या धमन्यांनाही चांगला फायदा होतो. नियमित मसाज केल्याने नसांना आराम मिळतो. यामुळे मनही शांत राहते. ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.
शांत झोप लागते:-मसाज केल्याने शांत झोप लागते.:- ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे. त्यांना फायदा होतो. समस्या दूर करा जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी बॉडी मसाज करा. यामुळे थकवा दूर होईल आणि त्याच वेळी तुम्हाला गाढ झोप लागेल.
मसाज केल्याने शरीर आणि मनाला आराम मिळतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते:-रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीराच्या मसाजमुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. होय, हे शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास उपयुक्त आहे आणि तणाव कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. ज्याद्वारे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता
.शारीरिक वेदना:-शारीरिक वेदना दूर करण्यासह बॉडी मसाजमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील मजबूत होते. एका अभ्यासातील माहितीनुसार, लिम्फ नोडच्या आसपास मसाज केल्यानं पांढऱ्या रक्तपेशींच्या प्रवाहाची गती वाढते. या पेशी अधिक सक्रिय होतात आणि आजारांविरोधात लढण्यास शरीरास मदत करतात.
मेंदू शांत होतो:-योग्य पद्धतीने मसाज केल्यास शरीर आणि मेंदूलाही पूर्णपणे विश्रांती मिळते. थाय आणि अरोमाथेरेपी मसाजमुळे मेंदू शांत राहण्यास मदत मिळते. अशा प्रकारच्या मसाजसाठी सुगंधित एसेंशिअल ऑइलचा वापर केला जातो.
आराम आणि तणाव कमी करणे:-ताण कमी करणे हा मसाजचा मुख्य फायदा आहे. मसाज थेरपी दरम्यान कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास आणि विश्रांतीस प्रोत्साहन मिळू शकते
.बद्धकोष्ठता पासून आराम:-तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा इतर पाचन समस्या असल्यास पोट मसाज केल्याने तुमची काही अस्वस्थता कमी होऊ शकते. ज्या लोकांना शस्त्रक्रियेनंतर बद्धकोष्ठतेचा अनुभव येत आहे त्यांना पोटाच्या मसाजच्या मदतीने थोडे बरे वाटते.
तणाव डोकेदुखीपासून आराम:-तणाव डोकेदुखी किंवा एकाग्रता डोकेदुखी, असे वाटू शकते की तुमच्या डोक्याभोवती एक घट्ट पट्टा गुंडाळला आहे. अशा प्रकारच्या डोकेदुखीवर मालिश केल्याने आराम मिळतो. विशेषतः, चेहर्याचा मसाज खांदे, मान आणि डोक्याच्या स्नायूंमधील तणाव कमी करून तुम्हाला फायदा होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या डोकेदुखीची लक्षणे कमी होऊ शकतात.
स्नायूंचा ताण आणि वेदना कमी करते:-मसाज थेरपीचे फायदे पुनर्वसन प्रक्रियेत मदत करू शकतात जेव्हा तुमचे स्नायू दुखतात आणि त्या प्रदेशात रक्त प्रवाह आणून सूज येते. हे जोरदार कसरत नित्यक्रमानंतर स्नायूंच्या थकवासह देखील मदत करते.
तात्पुरते सांधे आणि संधिवात वेदना आराम:-जर तुम्हाला संधिवात असेल तर तुमचे सांधे सुजतात आणि दुखतात. जेव्हा तुमचा मसाज थेरपिस्ट तुमच्या स्नायूंना मालीश करतो आणि मालिश करतो तेव्हा तुमच्या सांध्यामध्ये रक्त वाहते, ज्यामुळे क्षणिक आराम मिळू शकतो. तुमच्या मसाज थेरपी सत्रापूर्वी, तुम्हाला संधिवात आहे हे थेरपिस्टला कळवण्याची खात्री करा जेणेकरून ते तुम्हाला त्यानुसार मदत करू शकतील.
रक्ताभिसरण सुधारते:-मसाजचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की तो रक्त प्रवाह आणि ऊतकांना ऑक्सिजन पुरवठा वाढवून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि संपूर्ण शरीराचे कार्य वाढू शकते.
रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य वाढवते:-मसाज थेरपी नैसर्गिक किलर पेशींची क्रिया वाढवून आणि पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करू शकते, ज्यामुळे शरीराला संसर्ग आणि रोगापासून संरक्षण मिळू शकते.
त्वचेचे आरोग्य सुधारते:-चेहर्याचा मालिश रक्त प्रवाह उत्तेजित करून, लिम्फॅटिक ड्रेनेजला प्रोत्साहन देऊन आणि कोलेजनचे उत्पादन वाढवून त्वचेचे आरोग्य आणि देखावा सुधारण्यास मदत करू शकते
.गती आणि लवचिकता श्रेणी सुधारते:-मसाज थेरपी स्नायूंचा ताण कमी करून आणि संयुक्त गतिशीलता वाढवून गती आणि लवचिकता वाढविण्यात मदत करू शकते.
एकूणच आरोग्याची भावना वाढवते:-मसाज थेरपी तणाव आणि चिंता कमी करून, विश्रांतीला प्रोत्साहन देऊन आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारून संपूर्ण आरोग्याची भावना वाढविण्यात मदत करू शकते.
यासंदर्भात अधीक माहिती देताना सांगितले की या मसाज थेरपी मुळे अनेक नागरिक समाधानी आहेत. आजपर्यंत हजारो रुग्णांची मसाज केली आहे. हे करीत असताना अनेकांनी सुखद अनुभव विषद केले.मी येताना रडत आलो होतो.जाताना हसत जात आहे. खूप छान वाटलं.माझ्या मनामध्ये बरेच निगेटिव्हिटी भरली होती.परंतु मालिष घेतल्याने मला तारुण्य आले आहे.हॉस्पिटल ला जाने इतके बळ नव्हते. मसाज घेतल्यानंतर दवाखान्यात जावं वाटत नाही. एवढं बरं वाटतंय.खरंच तुमच्या हातामध्ये चमत्कार आहे जादूच आहे असं वाटल.अश्या माणसाची समाजाला गरज आहे.झोप शांत लागली.हाताच्या मुंग्या थांबल्या.असे अनेक अनुभव परिसरातील अनेक रुग्णांना आल्याचे ते आवर्जून सांगतात.
नितीन नेवसे यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले असून,कुटुंबात आजी, आजोबा, काका, काकी, एक चुलत भाऊ,आई-वडील पत्नीसह दोन मुली आहेत.शिवाय चार एकर शेती आहे. त्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. फळबाग लावल्या ने चांगले उत्पन्न मिळते.पत्नी घर काम बघत शेतीचे नियोजन आणि लेबर देखरेख करते.ह्या माझ्या कामांमध्ये पत्नी सौ. वनिता नेवसे हिचा सिंहाचा वाटा आहे. कारण तिच्या पाठिंब्या मुळेच मला मसाज सेवेसाठी वेळ देता येतो. असे ते आवर्जून सांगतात.
घरची परिस्थिती बेताची असून देखील मनुष्य धर्म पाळण्यासाठी सेवा करण्यासाठी इच्छापूर्ती म्हणून मसाज सेवेचे काम करत आहे.सध्या ते इंदापूर, अकलूज, बारामती परिसरात गरजेनुसार अतिशय अल्प मोबदल्यात घरपोच मसाज सेवा देत आहेत.ते परिसरात नेवसे मामा या नावाने ओळखले जातात.
बॉडी मसाज केल्याने कित्येक प्रकारच्या शारीरिक समस्या दूर होतात. पण मसाज थेरेपिस्ट अथवा तज्ज्ञमंडळीच्या मार्गदर्शनानुसार तसंच चांगल्या तेलाच्या मदतीनेच मसाज थेरेपी करावी.असे त्यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितले.या कामातून आपल्याला अधीक समाधान मिळत असल्याचे ते आवर्जून सांगतात.
अधीक माहितीसाठी व मसाज सेवेसाठी नितीन नेवसे (9890139925)या नंबर वर संपर्क साधून मसाज सेवेचा घरपोच लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.







