*अकलूज मध्ये विजयादशमी दसऱ्यानिमित्त श्री दुर्गा माता महादौडचे आयोजन*…….
.माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड







दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 रोजी, अकलूज शहरातील अकलाई देवी मंदिर या ठिकाणाहून संपूर्ण अकलूज परिसरामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज विभागाच्या धारकऱ्यांनी श्री दुर्गामाता महा दौड चे आयोजन केले होते.
माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील यांच्या हस्ते परम पवित्र भगव्या ध्वजाचे पूजन करून….या महादौडची सुरुवात करण्यात आली…
.दरम्यान या श्री दुर्गामाता दौंड मध्ये जवळपास 70 कलाकारांनी विविध वेशभूषा धारण करून अखंड हिंदुस्तानचे हिंदवी स्वराज्याचे तसेच हिंदू देवी देवतांचे दर्शन घडवले..या दौडमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह स्वराज्यातील नरवीर सरसेनापती शिलेदार मावळे नवदुर्गेची रूप धारण केलेल्या भगिनी भारतात होऊन गेलेल्या विरांगणाचे रूप धारण केलेल्या भगिनी या विविध रूपे धारण करून या दुर्गामाता दौड मध्ये सामील झाले होतेे……
..ही दौड दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानयांच्यावतीने सबंध महाराष्ट्रभर आयोजित केली जाते. अश्विन शुक्लपक्ष ते विजयादशमी दसरा.हे दहा दिवसरोज पहाटे ५:३० वाजता आपल्या गावातील देवीच्या मंदिरामध्ये आई दुर्गेच्या नावाने तुळजाभवानीच्या नावाने जागर केला जातो. व संपूर्ण गावांमधून ही दौड काढली जाते.
भारत मातेचा उध्वस्त होत चाललेला संसार पुन्हा सुरळीत होण्यासाठी…काढण्यात येणारी दौड म्हणजे श्री दुर्गा माता दौडश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक…आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शना खाली अकलूज शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून दौडीच आयोजन केलं जातं..
.अखंड हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही दौड तरुणांच्या नसा नसात बिंबवण्याचा काम व आपल्या हिंदू संस्कृतीचा जतन करण्याचं काम या श्री दुर्गा माता दौडच्या माध्यमातून केला जातो.
.आज अकलूज शहरांमधून निघलेली ही दुर्गा माता दौड अतिशय रंजक पद्धतीची डोळ्याचं पारने फिटावे अशा पद्धतीची रोमांचक दौड झाली.जात-पात गट तट राजकारण हे सर्व बाजूला ठेवून हिंदू धर्मासाठी केलेलं एकत्रित कार्य हिंदू धर्माच्या रक्षणासाठी खडी केलेली फौज म्हणजे श्री दुर्गा माता दौड म्हणून या दौडीकडे पाहिले जाते..
…श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान अकलूज विभागश्री दुर्गा माता दौड प्रमुख.सुधीर पवार,अकलूज






