*राज्यस्तरीय अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये स्कॉलर आय चॅम्प अबॅकस च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश-*
अकलूज (प्रतिनिधी )

अकलूज येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये नातेपुते येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे. यामध्ये करण रुपनवर,स्वराली पाटील व राजवीर दणाने या विद्यार्थ्यांनी सहा मिनिटाच्या आत शंभर गणिते सोडवून सुपर इंटेलिजंट ट्रॉफी चे मानकरी ठरले, तसेच देवांशी निकम, आरुषी बरडकर,प्रांजल मोहिते व आरोही उराडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
व यामध्ये इतर मुलांनीही घवघवीत यश मिळवले आहे या क्लासला बेस्ट फ्रेंचाईजी अवार्ड प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपा राणी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते रेश्मा तांबोळी यांना देण्यात आले. या क्लासची प्रगती चांगली असून सुरुवातीला 25 मुलांनी प्रवेश घेतला.परंतु आता मात्र 50 मुलांनी ऍडमिशन घेतले आहे.
या विद्यार्थ्यांना आय चॅम्प अबॅकस प्रा. ली. च्या संचालिका सौ. स्नेहल माने, संचालक विशाल माने व नातेपुते फ्रंचाई च्या रेशमा तांबोळी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.







