सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची 8ऑक्टोबर रोजी अकलूज येथे महत्वपूर्ण बैठक

अकलूज (प्रतिनिधी )संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 12ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड येथे दुपारी 12वाजता मराठ्यांच्या पहिल्या विराट दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातून हजारो बांधव फोर व्हीलर, टू व्हीलर मधून या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जाणार आहेत.यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सकल मराठा समाज माळशिरस तालुका यांची नियोजन बैठक *मंगळवार दि. 8/10/24 रोजी संध्याकाळी ठिक 5:00 वाजता आनंदमूर्ती मंगल कार्यालय, पंचवटी, अकलूज – टेंभुर्णी रोड* येथे होणार आहे.
तरी माळशिरस तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी वरिल ठिकाणी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज, माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.







