*अकलूज मध्ये दुर्गामाता दौड सुरुवात*
*संघर्ष योध्दा. माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड*

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या आवाहनुसार नवरात्रोत्सवच्या पहिल्या दिवसापासून अकलूज मध्ये दुर्गामाता दौड सुरुवात झाली आहे राष्ट्रभक्ती धर्मभक्तीच्या मार्गावर धिरोधात्त पणे चालण्यासाठी प्रेरणा बळ मिळावे तरूण पिढी सशक्त निर्व्यसनी राष्ट्रभक्त धर्मभक्त बनण्यासाठी दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात येते
नवरात्रात पुर्ण दहा दिवस अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई माता मंदिरापासून या दौडीस सकाळी सहा वाजता सुरवात होते अकलाई मंदिरापासूनच अकलाई माता कि जय दुर्गा माता कि जय.आंबेमाता कि जय छञपती शिवाजी महाराज की जय छञपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम भारत माता की जय आशा जयघोषात अकलूज मधील सर्व नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देत हि दुर्गा माता दौड परत अकलाई मंदिरात येते तिथं आरती.ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र होऊन या दौडीची सांगता होते
या दौडीमध्ये प्रत्येकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे दुर्गा माता दौड नवरात्रात नऊ दिवस रोज चालू असते..





