अबॅकस स्पर्धे च्या माध्यमातून मुलांची गणिताची गोडी वाढते-स्वरूपाराणी मोहिते पाटील
अकलूज, (प्रतिनिधी)- स. म. कारखान्याचे चेअरमन जयसिंह (बाळदादा)मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त 6ऑक्टोबर रोजी अकलूज येथील कृष्णप्रिया मल्टीफँक्शनल हॉल या ठिकाणी सकाळी ९ वाजता राज्य स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे बक्षीस वितरण यशवंतनगर येथील आय. चॅम्प अबॅकस प्रा. ली. यांचे वतीने प्रताप क्रीडा मंडळ च्या अध्यक्षा स्वरूपाराणी (दिदीसाहेब )मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते मोठया उत्साहात करण्यात आले.
तत्पूर्वी 29सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.या स्पर्धेसाठी माळशिरस तालुका, इंदापूर तालुका, पुणे जिल्हा, मोहोळ, पंढरपूर, माढा, बारामती या तालुक्यातील व इतर ठिकाणावरून अकलूज, वडापुरी, इंदापूर, पुणे, निमसाखर, वेळापूर, कासेगाव, नातेपुते, मोरोची, कुरवली, पिरळे, धर्मपुरी, आढेगाव, दहिवडी, फोंडशीरस, बरड, टाकळी, निमगाव केतकी अशा 18 केंद्रातून ४ते १५वर्षे वयोगटातील जवळपास ३०० स्पर्धक सहभागी झाले होते.
सदर स्पर्धा ४गटात घेण्यात आली.यात अनुक्रमे ४क्रमांक काढण्यात आले. तसेच इतरही जवळपास 200स्पर्धकांना बक्षीस स्वरूपात ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका सौ. स्नेहल माने यांनी केले. त्यांनी संस्थेच्या आजपर्यंत च्या प्रगतीचा आढावा घेतला. व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अबॅकस स्पर्धे च्या माध्यमातून मुलांची गणिताची गोडी वाढते. पूर्वी गणित सोडवायला वेळ लागत होता. परंतु अबॅकस मुळे अवघ्या काही सेकंदात गणित सोडवता येते.आजकालचे पालक हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दक्ष असल्याचे पाहून त्यांनी उपस्थित पालकांचे अभिनंदन केले.आय. चॅम्प अबॅकस प्रा. ली. ची प्रगती अतिशय चांगली असून, सुरवातीला 15 मुलांनी प्रवेश घेतला होता. परंतु आता अवघ्या दिड वर्षात मात्र 800प्रवेश आहेत. ही गोष्ट कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धेमुळे मुलांना यशस्वी होण्याची सवय लागते.या माध्यमातून येणाऱ्या काळात या मुलांमधून मोठे अधिकारी निर्माण व्हावेत. असे त्यांनी आवर्जून सांगितले.याप्रसंगी उल्लेखनीय कार्य केलेल्या 11महिला शिक्षिकांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढच्या वेळी याही पेक्षा दिमाखदार सोहळा होणार असल्याचे सांगत संचालक विशाल माने यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले.याप्रसंगी जिजामाता कन्या प्रशाले च्या मुख्याध्यापीका सुनीता वाघ, पत्रकार गणेश जाधव,स्पर्धक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.संचालक विशाल माने व संचालिका सौ. स्नेहल माने यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.






