स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने राज्यात मराठा जोडो अभियान राबविणार _ ओंकार निंबाळकर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा,मराठा समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा,अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे स्मारक उभे राहवे, गडकिल्ले संवर्धन करण्यात या सर्व मागण्या घेवून समाजात जनजागृती करण्यासाठी मराठा जोडो अभियान स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने राज्यात राबविण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख ओंकार निंबाळकर यांनी दिली आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील, स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील, यांच्या सह अनेक मराठा संघटना प्रयत्नशील आहे समाजातील युवकांनाव शेतकऱ्यांना जोडण्यासाठी मराठा जोडो अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे समाजातील गरीब आणि तळागाळातील घटक जोडण्यासाठी संघटनेचा प्रयत्न आहे.शेतकरी आज आर्थिक अडचणीत शेतकऱ्यांना अनुदान, कर्ज माफिची गरज नाही तर शेतकऱ्यांना पिकविलेल्या मालाला हमीभाव पाहिजे या राज्यात मराठा जोडो अभियान राबवून पंढरपूर मध्ये मराठा जागर बैठक घेण्यात येणार आहे असे स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख ओंकार राजे निंबाळकर यांनी सांगितले







