माने पाटील परिवाराकडून बागेचीवाडी गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी माताचरणी ११किलो तांब्याची घंटा अर्पण
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
बागेचीवाडी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात बागेचीवाडी गावचे लोकप्रिय सरपंच कृष्णराजभैय्या माने पाटील यांच्या परिवाराकडून ११किलो तांब्याची घंटा भेट म्हणून दिली
गावच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले सरपंच कृष्णराजभैय्या माने पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली बागेचीवाडी गावाने आर आर आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याचबरोबर गावात शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात ते आघाडीवर आहेत सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून त्याचं औचित्य साधून माने पाटील परिवाराकडून आज दि ५आक्टोंबर रोजी लक्ष्मीमाता चरणी ११कीलो वजणाची तांब्याची घंटा अर्पण केली






