मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य च्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी नियुक्ती जाहीर
अकलूज (प्रतिनिधी )संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपल्या सामाजिक कार्याने नावलौकिक मिळविलेल्या मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य च्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी नियुक्ती नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.
या समितीच्या माध्यमातून समाजातील लाचखोरी रोखणे व पीडित लोकांना मदत करणे, स्त्री भ्रूण हत्या रोखणे व समाजाला जागृत करणे,बाल मजुरी थांबवणे व कमी वयातील विवाहाला आळा घालणे,अंधश्रद्धा. व्यसनमुक्ती हुंडाबळी. दारूबंदी. याला आळा घालणे,वधू वर सूचक मंडळ स्थापन करून आंतरजातीय मुला मुलींचे विवाह लावून देणे.अनाथ बालकांना बालक आश्रम अनाथ आश्रम स्थापन करून त्यांना सोयी उपलब्ध करून देणे.थोर पुरुषांच्या जयंती राष्ट्रीय एकता व एकात्मता टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणे.क्षयरोग कुष्ठरोग वृक्षारोपण पशुसंवर्धन नेत्र तपासणी आरोग्य तपासणी यासारखे कार्यक्रमाचे आयोजन करणे.शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे.
याशिवाय इतरही अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.या समिती च्या नुकत्याच सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.सोलापूर जिल्हाध्यक्ष ओंकार निंबाळकर यांच्या मार्गदर्शन खाली दत्तात्रय अंबादास देठे यांची पंढरपूर तालुका अध्यक्ष,अनिकेत सीताराम जगताप यांची सांगोला तालुका अध्यक्ष,सोपान चव्हाण यांची माढा तालुका अध्यक्ष,बोडके यांची मोहोळ तालुका अध्यक्ष,गणेश जाधव यांची सोलापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी,सौ. श्वेता विकास भगत यांची माळशिरस तालुका अध्यक्ष,कु.कौसर हारून पठाण यांची करमाळा तालुका उपाध्यक्ष,कु. रुपलेखा उद्धव निंबाळकर यांची माळशिरस तालुका कायदेशीर सल्लागार पदी, सौ. शितल निरंजन देशमुख यांची माढा तालुका महिला अध्यक्ष पदी,गणेश मोहन चव्हाण यांची माढा तालुका कायदेशीर सल्लागार पदी तर औदुंबर पवार यांची माढा तालुका प्रचारक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान या निवडीचे महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सविताताई अकोलकर,राज्याचे अध्यक्ष श्रीकृष्ण पवार,राज्याचे उपाध्यक्ष डॉ प्रवीण चौधरी,नरेश रोडगे,रोहित पाटील,किशोर पाटील,मोहनप्रसाद दुबे,कार्याध्यक्ष सचिन धुळे , नेत्रदीपा पाटील, आशाताई घोडके स्नेहल पाटील संघटक संजय चव्हाण तसेच इतर पदाधिकारी यांनी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







