मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य ची अकोला येथे बैठक संपन्न





अकलूज (प्रतिनिधी )मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य च्या महाराष्ट्र अध्यक्ष तथा संस्थापक सविताताई अकोलकर महाराष्ट्र, अध्यक्ष श्रीकृष्ण पवार तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रवीण जी चौधरी, महाराष्ट्राचे संघटक संजयजी चव्हाण तसेच दिवाने सर आदी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अकोला येथे नवनिर्वाचित अकोला जिल्हाध्यक्ष गजानन जी भिसे,विदर्भ उपाध्यक्ष अक्षय जी अकोलकर असे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या समवेत मीटिंग घेण्यात आली.
समितीबाबत विस्तृत पणे चर्चा केली जेणेकरून सर्वांच्या हाताला काम मिळेल सर्वांचे आर्थिक बाजू बळकट बनेल या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे अकोल्यात काही प्रकरणे होती असे काही हिंसाचार हुंडाबळी आणि काही प्रकरणे तर खूप क्रिटिकल होती अशा सर्व प्रकारची प्रकरणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आणि त्यावर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून आपल्या लेटर पॅड वर सगळे त्यांचे म्हणणे त्यांच्यासोबत झालेला अन्याय लेखी स्वरूपात घेऊन ते लेटर पॅड द्वारे डिपार्टमेंटला निवेदन देण्याचे काम करणार असे असे सर्वांनी नमूद केले आणि सर्वांचे स्वागत झाले व नवनिर्वाचित अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष गजानन जी भिसे यांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले.
अल्पोपहार घेऊन मीटिंगची सांगता झाली मानव सुरक्षा सेवा समितीच्या अध्यक्षा तथा संस्थापक यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मीटिंगची सांगता करण्यात आली.






