जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त आय चॅम्प अबॅकस प्रा. ली. यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन

अकलूज (प्रतिनिधी )सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त आय चॅम्प अबॅकस प्रा. ली. यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक विशाल माने व स्नेहल माने यांनी दिली.
सदर स्पर्धेसाठी 2सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करता येईल. 29सप्टेंबर रोजी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार असून बक्षीस वितरण समारंभ अतिशय दिमाखदार पद्धतीने प्रताप क्रीडा मंडळ च्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी (दिदीसाहेब )मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये 6ऑक्टोबर रोजी कृष्णप्रिया मल्टीफँक्शनल हॉल संग्रामनगर अकलूज येथे होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० मार्क्स असतील त्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.३ मिनिटा मध्ये ज्या मुलांचे पेपर होईल त्यातील ३ विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच दिले जाणार आहे.पहिले ३ टॉपर साठी.४ मिनिटे- सुपर इंटेलीजेंट चैम्प ट्रॉफी १०० पैकी १००गुण.४.१ ते ५ मिनिटे – फर्स्ट रँक ट्रॉफी १०० पैकी १००,५.१ ते ६ मिनिटे – सेकंड रँक ट्रॉफी १०० पैकी १००,६.१ मिनिटे ते ७ मिनिटे – थर्ड रैंक ट्रॉफी १०० पैकी १००.याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.


तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधीक माहितीसाठी 7218100900या मोबाईल वर संपर्क साधावा









