सकल मराठा समाजाची आज वेळापूर येथे महत्वपूर्ण बैठक
निमगाव/ प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची 7 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर येथे मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी जनजागृती व शांतता रॅली आयोजित केली असून या रॅलीमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत यासाठी माळशिरस तालुक्यातून लाखो मराठा समाज बांधव 7 ऑगस्ट रोजी सोलापूरला जाणार आहेत या नियोजनासाठी सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक वेळापूर येथे आज सोमवार दि 29 जुलै रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने देण्यात आली
वेळापूर येथे होणाऱ्या बैठकीत सोलापूरहून येणारे सकल मराठा समन्वयक माळशिरस तालुक्यातील समाज बांधवांना मार्गदर्शन करणार असून माळशिरस तालुक्यातून किती व कोणत्या वाहनातून समाजबांधव सोलापूरला येणार आहेत सोलापूरला आल्यानंतर ते ज्या वाहनातून येणार आहेत त्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जनजागृती व शांतता रॅलीत सहभागी होत असताना कोणती दक्षता घ्यावयाची आपल्याबरोबर येणाऱ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत काय काळजी घ्यावयाची या व अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली
वेळापूर येथे आज होणाऱ्या बैठकीसाठी माळशिरस तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व सन 2016 च्या मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभागी होताना जी उपस्थिती दाखवली होती त्याच उपस्थितीने 7 ऑगस्ट रोजी सोलापूरला जाण्यासाठी जे जे काही नियोजन करावयाचे आहे त्या बाबतीत आज सकल मराठा समाज बांधवांच्या बैठकीत मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
चौकट
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी माळशिरस तालुक्यातील भाजपच्या ज्या काही नेते मंडळींनी टीका केली त्या नेते मंडळींचा सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने रविवारच्या बैठकीत तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला असून यापुढे त्यांनी आपल्या तोंडाला लगाम घालावा अन्यथा त्याच स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल असाही इशारा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला .







