8मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आय. चॅम्प प्रा. ली. व ईश्वरी अबॅकस अकॅडमी यांचे वतीने सवलतीत फ्रेंचायसी उपलब्ध
अकलूज (प्रतिनिधी ) 8मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परिसरातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून यशवंतनगर येथील आय. चॅम्प प्रा. ली. व ईश्वरी अबॅकस अकॅडमी यांचे वतीने खास महिला दिनानिमित्त आय चॅम्प अबॅकस ची फ्रेंचायसी खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना यशस्वी उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे. ही फ्रेंचायसी ना नफा ना तोटा या तत्वावर अतिशय अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आठवड्यातून फक्त चार तास यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. याशिवाय ऑनलाईन, ऑफलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. पदवीधर, बी. एड, खाजगी क्लास धारक व खाजगी शाळेचे शिक्षक, सुशिक्षित बेरोजगार यांचेसाठी सदर संधी उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही फ्रेंचायसी देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक विशाल माने व सौ. स्नेहल माने यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,अॅबॅकस हे शतकानुशतके जुने गणिताचे साधन आहे, जे मोजणीसाठी वापरले जाते. ते अनेक, प्रामुख्याने, आशियाई आणि आफ्रिकन देशांमधील आणि जगाच्या इतर भागांमध्ये व्यापारी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जरी सापडलेला सर्वात जुना अबॅकस 300 बीसीएवढा जुना असल्याचे म्हटले जाते आणि ते मेसोपोटेमिया, इजिप्त, पर्शिया, ग्रीक, रोम आणि भारतात वापरले जात असले तरी, चीन आणि जपानमध्ये त्याचा वापर जास्त प्रमाणात आढळतो.हे दोन क्षेत्रांमध्ये विभागलेले आहे , वरचा प्रदेश आणि खालचा प्रदेश. विभाजनाला मध्यवर्ती रॉडने चिन्हांकित केले जाते ज्याला बार म्हणतात . हे मेंदूच्या क्रियाकलाप सुधारण्यासाठी मानसिक गणना करण्यास मदत करते . हे बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकारासाठी वापरले जाते.याशिवाय अँबॅकस शिकण्यामुळे एकाग्रता वाढते,तार्किक समज सुधारतेगणिती प्राविण्य,कल्पनाशक्ती वाढवते.सर्जनशीलता वाढते,आत्मविश्वास वाढतो,स्मरणशक्ती वाढते,मेंदूची कार्यक्षमता सुधारते,निरीक्षण आणि ऐकण्याचे कौशल्य सुधारते,तणाव कमी होतो,वेग आणि अचूकता सुधारते,शिकण्याच्या मूलभूत गोष्टी मुधारतात,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अधीक माहितीसाठी (9850754004.7218100900.)या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







