एसटीत प्रवास करताना तिकीटाचे पैसे ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरू.
अकलूज (प्रतिनिधी )एसटी बस ने प्रवास करताना तिकिटासाठी रोख रक्कम बाळगण्याची किंवा सुट्ट्या पैशांसाठी वारंवार होणारी कटकट आता मिटणार आहे.कारण प्रवाशांना तिकिटाचे पैसे आता ऑनलाईन देता येणार आहेत.
एसटी महामंडळाने प्रवास करताना तिकिटाचे पैसे वाहकाजवळ असलेल्या क्यू आर कोड द्वारे आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध केली असून,अकलूज आगाराच्या वतीने शनिवार९डिसेंबर पासुन क्यु आर कोड द्वारे तिकिटाचे पेमेंट स्वीकारण्याची सेवेचा प्रारंभ केला असल्याची माहिती आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली.
एसटीने प्रवास करताना प्रवास छोटा असो वा मोठा तिकिटाची रक्कम रोख द्यावी लागते. त्यासाठी प्रवाशांना व वाहकाना रोख रकमेसह सुट्टे पैसेही जवळ बाळगणे क्रमप्राप्त होते. पूर्ण तिकीट असो वा जवळचा प्रवास, अर्धे तिकीट व तत्सम सवलती असो सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण होत असते. या पैशाच्या देवान घेवानीत बऱ्याचदा सुट्ट्ये पैसे देणे-घेण्यावरून वाहक व प्रवाशांत वादविवाद होत असतात.
आता या सर्व अडचणी दूर होणार आहेत. प्रवाशांनी प्रवास करताना वाहकाजवळ असलेल्या तिकीट मशीनच्या स्क्रीनवर क्यू आर कोड असेल. हा क्यू आर कोड स्कॅन करून प्रवासी त्यांच्या मोबाईलवरून संबंधित प्रवासाचे भाडे भरू शकतात. या सोयीमुळे प्रवासी प्रवासाचे नेमके भाडे देऊ शकतो. त्यास रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नाही. तसेच सुट्ट्या पैशांची कटकट होणार नाही.त्यामुळेही एसटी वाहकांची व प्रवाशांचे होणारे वादविवाद कमी होतील.
एसटी महामंडळाचा अखेर कॅशलेस प्रवास सुरु झाला असून,आता UPI द्वारे तिकिटाचे पैसे देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. आताच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. चहावाल्यापासून ते मॉलपर्यंत सर्वत्र ग्राहक ऑनलाइन पैसे देतो. सर्व व्यवहारांत कॅशलेसवर भर देण्यात येत असताना एसटीचे तिकीट मात्र रोख रक्कम देऊनच काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकीट देण्याची सोय सुरू केली आहे,
देश डिजिटल होत असताना आपली एसटी कशी मागे राहणार , नागरिकांना होणार त्रास व वाहकाना होणारा त्रास लक्षात घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेत क्यूआर कोड ची सुविधा चालू केली आहे , यामुळे प्रवासातील होणाऱ्या सुट्या पैश्याच्या वादाला आता पूर्ण विराम लागणार आहे , या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागत केले जात आहे .
एसटी महामंडळाच्या पुणें विभागातील रा.प.मुंबई/ पालघर / ठाणे/ रायगड/ रत्नागिरी / सिंधुदुर्ग / पुणे/ सातारा/ सांगली/ कोल्हापूर/सोलापूर/ नाशिक /धुळे/ जळगांव / अहमदनगर/छ. संभाजीनगर / धाराशिव / बीड / नांदेड / लातूर/ परभणी/ जालना / नागपूर/ भंडारा/चंद्रपूर/ वर्धा / गडचिरोली/अकोला/अमरावती/यवतमाळ / बुलढाणा विभाग.अशा सर्व आगाराना याचे आदेश देण्यात आले आहेत,
पुढील टप्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा विविध टप्प्यात उपलब्ध होणार आहे. सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क करावा. तसेच ई-मेल wecare@aritelbank.com येथे संपर्क करावा. सदर क्रमांक हे २४ तास उपलब्ध आहेत.
तरी या सुविधेचा लाभ सर्व प्रवाशी यांनी घ्यावा. असे आदेश महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी सर्व आगार प्रमुख यांना दिले आहेत.







