ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राची तनुजा व दिक्षा हिची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड प्रतिनिधी/ अकलूज; दिनांक २८ नोव्हेंबर रोजी पंजाब चंडीगड येथे संपन्न झालेल्या साऊथ व वेस्ट झोन आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत अकलूजच्या ताराराणी महिला कुस्ती केंद्रातील कु. तनुजा तानाजी देवकर हिने ५९ किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला तर कु.दीक्षा विजय गोठनेकर हिने ५३ किलो वजनगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.या दोन्ही खेळाडूंनी इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांकाने विजयी झाल्याने त्यांची ऑल इंडिया विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल खेळाडू व प्रशिक्षक सतपालसिंह यांचे शिवरत्न कुस्ती केंद्राचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील, ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी अभिनंदन केले ताराराणी कुस्ती केंद्र,राष्ट्रीय पातळीवरील उच्च व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणारे कुस्ती केंद्र म्हणून सोलापूर जिल्ह्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात नावारूपास येत आहे.
दिल्ली येथे झालेल्या कुस्ती महासंघाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ताराराणीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत रौप्य व कास्य पदक मिळवले होते. ताराराणी कुस्ती केंद्र ग्रामीण भागातील महिला खेळाडूंना हरियाणा येथिल NIS कोच सतपाल सिंह हे राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देत आहेत







