अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालय संदर्भात संघर्ष योद्धा डिजिटल न्यूज पोर्टल वर प्रकाशित झालेल्या दोन बातमी संदर्भात खुलासा
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालय संदर्भात संघर्ष योद्धा डिजिटल न्यूज पोर्टल वर 6नोव्हेंबर रोजी अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची व पक्षकाराची गैरसोय तर 25नोव्हेंबर रोजी अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालय मधील अधिकारी यांचे गैर कारभाराबाबत अकलूज येथील महिलेचे महसूल मंत्र्यांना निवेदन अशा आशयाची बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
सदर पहिली बातमी गैर समजुती मधून प्रकाशित करण्यात आली होती.तर दुसरी बातमी अकलूज येथील सौ. जीवनकला बाबाराव रोटे यांनी राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना 6ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनच्या आधारे प्रकाशित करण्यात आली होती.
वास्तविक पाहता यासंदर्भात 3नोव्हेंबर रोजी सौ. रोटे यांनी अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे निवेदन दिले असून सदर स्टॅम्प ड्युटी स्व इच्छेने भरली असल्याचे नमूद केले आहे.
त्यामुळे अकलूज येथील दुय्यम निबंधक अधिकारी श्रीमती अपर्णा गुरव यांची काहीही चूक दिसून येत नाही.
परंतु अनवधानाने प्रकाशित झालेल्या दोन्ही बातम्या मुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. व वरिष्ठ अधिकारी यांना उत्तर द्यावे लागले.
त्यामुळे संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल च्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.






