अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालय मधील अधिकारी यांचे गैर कारभाराबाबत अकलूज येथील महिलेचे महसूल मंत्र्यांना निवेदन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालय मधील श्रीमती अपर्णा गुरव यांचे गैर कारभाराबाबत व जास्तीची मुद्रांक शुल्क वसुल केले बाबत त्यांच्यावर कारवाई करणेबाबत अकलूज येथील सौ. जीवनकला बाबाराव रोटे( वय ४५ वर्षे)यांनी राधाकृष्ण विखे पाटील, महसुल मंत्री म.रा. मंत्रालय मुंबई. यांना 6ऑक्टोबर रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे सांगितले आहे की,श्रीमती अर्पणा गुरव दुय्यम निबंधक अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर यांना मुद्रांक शुल्क बाबत कोणतीही कायदेशीर माहिती नाही. व शासन निर्णयानुसार त्यांचे कामकाज चालत नाही. खरेदीखताकरीता महिला खरेदीदारांना १ टक्का स्टॅम्प सवलत आहे. असे असताना सुध्दा दस्त नं. २५८५/२०२३ या दस्तास जाणुन बुजुन रक्कम रुपये ४०,०००/- अक्षरी चाळीस हजार रुपयाचा मुद्रांक विनाकारण काढण्यास लावला आहे. सदरची रक्कम मला ताबडतोब परत मिळावी व त्यांच्यावर शासन कारवाई करुन त्यांची बदली करावी. त्यांनी परिसरातील शेकडो शेतक-यांना विनाकारण वेठीस धरले आहे.त्यामुळे महसूल मंत्री यांनी त्यांचेवर कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन अकलूज येथील सौ . जीवनकला बाबाराव रोटे यांनी दिले आहे







