*आमदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नातून पालखी महामार्गा संदर्भात अकलूज येथे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक .*
अकलूज (प्रतिनिधी )दोन्ही संतांच्या पालखी महामार्गावरील विवादीत मुद्दे सोडवण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून अकलूज येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकारी व तक्रारदारांची संयुक्त बैठक घेऊन तत्काळ आणि कायमचा तोडगा काढण्याचे धोरण ठरवले .
यावेळी प्रांताधिकारी नामदेव टिळेकर ,भाजपनेते धैर्यशील मोहिते पाटील , अर्जुनसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते .
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जानेवारी महिन्याच्या सुमारास या महामार्गांचे लोकार्पण करण्याची शक्यता आहे . त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून या दोन्ही संतांच्या पालखी महामार्गाचा दैनंदीन आढावा घेतला जात असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले .







