अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची व पक्षकाराची गैरसोय
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची व पक्षकाराची गैरसोय होत आहे.कार्यालयातील गोंधळाच्या परिस्थितीबद्दल पक्षकारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
.दस्त पडताळणी फी चे ऑनलाईन चलन काढणे गरजेचे असताना ते चलन ऑफलाईन पद्धतीने काढतात. यामूळे गैरव्यवहारास चालना मिळत आहे .झालेल्या व्यवहाराचे दस्तनोंदणी लवकर स्कॅन करत नाहीत . दस्त वेळेवर मिळत नाही. याकरिता दोन दोन दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. खरेदी विक्री चे व्यवहाराकरिता दस्त नोंदणी करिता दस्ताची नोंद घेऊन टोकन क्रमांक दिला जात नाही. टोकन क्रमांकाकरिता डिजिटल डिस्पले मूळे संबंधिताना वेळेत माहिती मिळते .
परंतु या कार्यालयात डिजिटल डिस्पलेची सुविधा नाही. दस्तात काही त्रुटी असल्याचे सांगून अर्थपूर्ण तडजोड केली जाते. या कार्यालयात अनाधिकृत व्यक्ती खुलेआमपणे कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत नागरिकाची पक्षकाराची लूट होत आहे.
दस्त नोंदणी साठी देखील अवांतर फि घेतली जाते.तसेच अनेक दस्त बेकायदेशीर झाले असल्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.
अशी विदारक परिस्थिती असल्याने ग्रामस्थाची, पक्षकाराची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कार्यालयातील मनमानी कारभारबद्दल पक्षकारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या सर्व बाबीची जिल्हाधिकारी मार्फत बेकायदेशीर दस्ताची नोंदणीची चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे
.सर्टिफाईड प्रतींसाठी दुप्पट पैशाची मागणी केली जात आहे. आम्ही दाखल केलेला दस्त फेटाळला जातो; परंतु तोच दस्त एजंटांकडून आला तर मात्र लगेच नोंदवला जातो. अशी अनेकांची तक्रार आहे.दस्ताची इंडेक्स आणि पावती लागलीच खातेदाराला देणे गरजेचे आहे; परंतु ती देखील दिली जात नाही.
अकलूज येथील दुय्यम निबंधक अधिकारी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सर्व दस्त ची चौकशी वरिष्ठ पातळीवरून करावी. अशी मागणी होत आहे.






