मराठा आरक्षण साठी तरुणाची आत्महत्या मराठा आरक्षण साठी अजून किती बळी जाणार -योगेश केदार
अकलूज (प्रतिनिधी )मराठ्यांचा पुन्हा बळी? मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणी करिता माडज ता.उमरगा येथील पहिला बळी गेला. कै किसन चंद्रकांत माने (वय 35) यांनी माडज गावच्या चौकातल्या तळ्यात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधी त्यांनी आरक्षण मिळावे अशी मागणी करत ओरडत त्यांनी तळ्यात उडी मारली असे गावकऱ्यांनी सांगितले. सरकार ने मराठ्यांचा अंत बघू नये. अजुन किती बळी घेणार आहात? मराठ्यांना तत्काळ ओबीसी मधून आरक्षण द्या. अन्यथा मराठ्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. आता मराठ्यांच्या उग्र रूपाला तुम्हाला समोरे जावे लागेल.असा इशारा मराठा आंदोलक योगेश केदार यांनी दिला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली







